अभिनेत्री नुसरत भरुचा आणि रॅपर हनी सिंग एका इव्हेंटमध्ये हातात हात घालून पोहोचले होते. त्या दोघांनी ‘सैय्यां जी’ नावाच्या गाण्यात एकत्र काम केलं होतं. हनी सिंगचा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे तो नुसरतबरोबर दिसल्याने त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या. आता नुसरतने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – गरोदर आहे दिव्यांका त्रिपाठी? पती विवेक दहिया म्हणाला…

नुसरत भरुचा तिचा आगामी चित्रपट ‘छत्रपती’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यावेळी तिने हनी सिंगला डेट करत असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना ती म्हणाली, “तुम्हाला माहीत आहे का? ही माझ्या आयुष्यातील पहिली डेटिंग अफवा आहे. आतापर्यंत माझ्याबद्दल कोणतीही अफवा पसरली नव्हती, कारण मी कधीच कुणाबरोबर जायचे नाही. आता या अफवा पाहून मला वाटतंय, चला. कोणतीतरी एक अफवा आहे. आता जेव्हा लोक मला हे प्रश्न रॅपिड फायरमध्ये विचारतील, तेव्हा मी किमान त्यांना सांगू शकते की माझ्याही डेटिंगची अफवा होती.”

“मला वाटते की लोकांकडे आयुष्यात कोणतेही काम नाही, तसेच त्यांची कल्पनाशक्तीही चांगली आहे, त्यामुळे त्यांनी अशा अफवा पसरवल्या, तरी मला त्याबद्दल काहीच अडचण नाही,” असं नुसरतने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘छत्रपती’ हा चित्रपट एसएस राजामौली यांच्या प्रभास-स्टाररचा चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटात भाग्यश्री, शरद केळकर आणि करण सिंग छाबरा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १२ मे रोजी रिलीज होणार आहे.