अभिनेता कमाल आर. खान म्हणजेच केआरके त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत अडचणीत येत असतो. गेल्या काही वर्षांपासून तो चित्रपट समीक्षण देखील करु लागला आहे. तो ट्विटरवर फार सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडविरोधात अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. विवादास्पद ट्वीट्स केल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्याच्यावर कायदेशीर कारवाईदेखील करण्यात आली होती.

रविवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी याची जयंती देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. देशामधील प्रत्येक नागरिकाने बापूंचे पुण्यस्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान केआरकेने गांधी जयंतीच्या निमित्ताने एक व्हिडीओ ट्वीट केला होता. या व्हिडीओमध्ये एका पक्षातील नेता त्यांच्या कार्यकर्त्यांसह महात्मा गांधींच्या पुतळ्याला हार घालताना दिसत आहे. पुतळ्याला हार घालताना तो नेता बापू-बापू ओरडत धसाधसा रडायला लागतो आणि तसाच रडत-रडत हातातला हार पुतळ्याच्या गळ्यात घालतो. रडणाऱ्या प्रमुखाला आजूबाजूचे कार्यकर्ते सांत्वना देत सावरतात. या गमतीदार व्हिडीओला केआरकेने “हा फार उत्तम नट आहे. याला मी माझ्या पुढच्या चित्रपटामध्ये नक्की रोल देईन”, असे कॅप्शन दिले होते.

आणखी वाचा – “माझा अजूनही विश्वास बसत नाही की…”, रश्मिका मंदानाची अमिताभ बच्चन यांच्यासाठी स्पेशल नोट

केआरकेने पोस्ट केलेला हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा आहे. २०२१ मध्ये हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. पोस्ट केल्यावर लगेच तो व्हायरल झाला होता. तेव्हा व्हिडीओमध्ये रडणारी व्यक्ती समाजवादी पार्टीचे नेते गालिब खान असल्याची माहिती समोर आली होती. नेटीझन्सनी या व्हिडीओवर बरेचसे मीम्स तयार केले होते. या व्हायरल व्हिडीओमुळे गालिब खान मोठ्या प्रमाणावर ट्रोलही झाले होते. काहींनी त्यांनी केलेल्या ‘ओव्हरअ‍ॅक्टींगसाठी त्यांचे ५० रुपये कापले जावेत’ असे म्हटले होते. तर काहीजणांनी त्यांच्या खोट्या रडण्यावरुन त्यांची खिल्ली उडवली होती.

आणखी वाचा – “दिग्दर्शकाला फोन करून सांगितलं ‘ही’ व्यक्तिरेखा स्वीकारून मी चूक… ” आदिपुरुष चित्रपटातील अभिनेता प्रभासने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२ ऑक्टोबरच्या निमित्ताने हा जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर पसरला होता. त्यातून तो केआरकेच्या हाती लागला आणि त्याने तो व्हिडीओ पोस्ट केला.