scorecardresearch

विवाहित महेश भट्ट पडलेले सोनी राजदान यांच्या प्रेमात; वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल आलिया भट्ट म्हणालेली, “मी माणसं…”

एका व्हिडीओत आलिया तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल बोलली होती.

alia-bhatt-mahesh-bhatt-director-sadak-2-1200
आलिया भट्टचं महेश भट्ट यांच्याबद्दल वक्तव्य

अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. ती अनेक विषयांवर तिचं मत मांडत असते. आलियाचे वडील महेश भट्ट यांनी दोन लग्ने केली. त्यांचं पहिलं लग्न किरण यांच्याशी झालेलं, त्यांच्यापासून त्यांना राहुल व पूजा अशी दोन अपत्ये आहेत. त्यानंतर त्यांनी सोनी राजदान यांच्याशी लग्न केलं होतं. महेश भट्ट यांच्या प्रेमप्रकरणाची खूप चर्चा होते.

Video: …अन् खासदार सुजय विखेंबरोबर थिरकला गौरव मोरे, व्हिडीओ तुफान व्हायरल

आलिया भट्टचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल बोलली होती. महेश सोनी राजदान यांच्या प्रेमात पडले आणि किरणपासून वेगळे झाले, पण त्यांनी कधीच किरण यांना घटस्फोट दिला नाही. घटस्फोट न देताच त्यांनी सोनी यांच्याशी लग्न केलं होतं.

पराठा बनवण्यावरून आईशी वाद; प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेत आत्महत्या

‘कलंक’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी आलियाला विवाहबाह्य संबंध व व्यभिचार याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तिने उत्तर देताना आपण व्यभिचाराचा प्रचार करत नाही, पण त्या गोष्टी कोणत्या ना कोणत्या कारणाने होतात, असं म्हटलं होतं. आपल्या वडिलांच्या संबंधांबद्दल बोलताना आलिया म्हणालेली, “माझी आयुष्यातील घटनांबद्दल कोणतीही मतं ठाम नाहीत. त्यामुळे जीवनात काही गोष्टी कोणत्या ना कोणत्या कारणाने घडतात. कोणीही व्यभिचाराचा प्रचार करू इच्छित नाही, मलाही करायचा नाही, पण मी माणसं ओळखते आणि नेहमी ते इतकं सोपं नसतं.”

आपल्या समाजात व्यभिचार खूप होतो आणि कुणाला ना कुणाला याचा सामना करावा लागतोच. आता असं होत नाही, असं तुम्ही म्हणून शकत नाही. या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत, असं आलिया म्हणाली होती. त्यावेळी तिला खूप ट्रोल केलं गेलं होतं. आलिया तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे असं बोलल्याचंही अनेकांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 15:03 IST

संबंधित बातम्या