गेले काही दिवस बॉलिवूडबद्दल अनेक खुलासे करणारी प्रियांका चोप्रा चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडमधील कंपूशाहीबद्दल तिने मुलाखतीत वक्तव्य केल्याने ती प्रकाशझोतात होती. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून विविध गोष्टी पोस्ट करत असते, पण एका अशाच पोस्टमुळे या ग्लोबल स्टारला पाकिस्तानी अभिनेत्याने ट्रोल केलं आहे.

लग्नानंतर १२ वर्षे आई होऊ शकली नव्हती मंदिरा बेदी, मनोरंजनसृष्टीला जबाबदार धरत म्हणालेली, “हे क्षेत्र क्रूर…”

प्रियांकाने पाकिस्तानी दिग्दर्शक शर्मीन ओबेद चिनॉय यांना कलर्सची पहिली महिला आणि ‘स्टार वॉर्स’ चित्रपट दिग्दर्शित करणारी पहिली महिला बनल्याबद्दल अभिनंदन केले होते. ते करताना प्रियांकाने तिला ‘दक्षिण आशियाई’ म्हटले. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, “कलर्सची पहिली व्यक्ती आणि ‘स्टार वॉर्स’ चित्रपट दिग्दर्शित करणारी पहिली महिला…आणि ती दक्षिण आशियाई आहे!! शर्मीन ओबेद चिनॉय हा किती ऐतिहासिक क्षण आहे. मला तुझा अभिमान आहे.”

शर्मीन चिनॉयला दक्षिण आशियाई म्हटल्याबद्दल पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकी याने प्रियांका चोप्रावर जोरदार टीका केली. ‘मॉम’ चित्रपटातून श्रीदेवीसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा पाकिस्तानी अभिनेता अदनानने एक ट्वीट केलंय. “प्रियांका चोप्रा, तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की शर्मीन ओबेद चिनॉय पाकिस्तानी आहे. अगदी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्ही दक्षिण आशियाई असल्याचा दावा करण्यापूर्वी जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्ही तुमचे भारतीय राष्ट्रीयत्व दाखवता,” असं अदनान सिद्दीकीने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अदनानच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत प्रियांकाला तिचं नॉलेज वाढवण्याचा सल्ला दिला आहे. शर्मीन पाकिस्तानी असतानाही तिला दक्षिण आशियाई म्हटल्यावर या अभिनेत्यासह नेटकरीही टीका करत आहेत.