अभिनेते पंकज त्रिपाठी त्यांच्या अष्टपैलू भूमिकांसाठी ओळखले जातात. ते विविध प्रकारची पात्रं अगदी सहज साकारतात. मग ते ‘मिर्झापूर’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील गँगस्टर असो वा ‘बरेली की बर्फी’ आणि ‘गुंजन सक्सेना’मधील भावनिक वडिलांची भूमिका असो. प्रेक्षकांनी त्यांना आजपर्यंत रॉयल किंवा श्रीमंत भूमिकेत पाहिलं नाही. पण संधी मिळाल्यास आपण तशी भूमिका सक्षमपणे साकारू शकतो, असं पंकज त्रिपाठींना वाटतं. चित्रपटांमध्ये कलाकारांना त्यांच्या लूकच्या आधारे विशिष्ट भूमिका दिल्या जातात, असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी सिनेमाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे, असं नमूद केलं. “सिनेमात आपण एक स्टिरिओटाईप बनवला आहे की डॉक्टर असा दिसतो, इंजिनिअर असा दिसतो. ऑडिशन दरम्यान अगदी कनिष्ठ कलाकारांसाठी ‘रिच लूक, कॉर्पोरेट लूक’ असं थोडक्यात लिहिलं जातं. आम्ही दिसण्यावर आधारित जगाची विभागणी केली आहे. कतरिना कैफची आपण डॉक्टरच्या भूमिकेत कल्पना करतो. पण तुम्ही दिल्लीच्या एम्समध्ये जा, तिथे तुम्हाला किती कतरिना सापडतील?” असा सवाल त्यांनी केला.

“तो सतत खोटं बोलत होता आणि…”, प्राजक्ता माळीचा ‘त्या’ रिलेशनशिपबद्दल खुलासा; म्हणाली, “त्याचे पुरावे…”

आपलं म्हणणं अधिक स्पष्टपणे मांडण्यासाठी त्रिपाठी यांनी भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक मुकेश अंबानी यांचे उदाहरण दिले. “कल्पना करा की मुकेश अंबानी उद्योगपती नसून अभिनेते असते. जर ते ऑडिशनसाठी गेले असते, तर त्यांना श्रीमंत उद्योगपतीची भूमिका कधीच दिली गेली नसती. ‘त्याच्याकडे श्रीमंत लूक नाही’ असं म्हटलं गेलं असतं. हा श्रीमंत लूक काय आहे? ते देशातील सर्वात मोठे उद्योगपती आहेत,” असं पंकज त्रिपाठी म्हणाले.

नवीन संसार अन् मालिकेचं शूट कसं सांभाळतेय सुरुची अडारकर; म्हणाली, “माझा नवरा पियुष…”

पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले, “सिनेमात व्यक्ती कशी दिसते यावर आधारित भेदभाव असला तरी समाजात तसं नाही. खरंतर प्रत्येकाने आपला विशिष्ट असा समज निर्माण केला आहे की एक पोलीस असा दिसतो, एक श्रीमंत माणूस असा दिसतो, गरीब माणूस असा दिसतो. पण समाजात असं होत नाही.”

“दागिने गहाण ठेवले, FD मोडल्या”, भलंमोठं कर्ज काढून प्राजक्ता माळीने घेतलंय फार्महाऊस; म्हणाली, “माझ्या आईने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास पंकज त्रिपाठी सध्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘मैं अटल हूं’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. १९ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत आहेत.