बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान यानं ‘डंब बिरयानी’ नावाचं एक नवीन यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. काल मंगळवारी (१६ एप्रिल) अरहानने एका एपिसोडचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला होता; ज्यात त्याची आई मलायका अरोरादेखील आहे. याआधी अरहाननं त्याचे वडील अरबाज खान, सोहेल खान यांच्याबरोबरही एक एपिसोड शूट केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर शेअर केलेल्या टीझरमध्ये सुरुवातीला अरहानची आई मलायका त्याला विचारताना दिसते की, “तू तुझी व्हर्जिनिटी कधी गमावलीस?” या प्रश्नावर आश्चर्यचकीत होऊन “काय?” अशी प्रतिक्रिया अरहानने दिली. त्यावर मलायका म्हणाली, “याचं उत्तर मला लगेच दे.” तितक्यात अरहानने मलायकाला पुढचा प्रश्न विचारला, “आई तू लग्न कधी करणार?”

हेही वाचा… लवकरच आई होणाऱ्या दीपिका पदुकोणने सुरू केलं भरतकाम; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

अरहानच्या एपिसोडचा हा टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स आल्या आहेत. एकानं कमेंट करीत लिहिलं, “या एपिसोडसाठी खूप उत्साही आहे.” “मलायकाला माझा पुढचा प्रश्न आहे की, ती अर्जुन कपूरशी कधी लग्न करणार आहे?” असं दुसऱ्या युजरनं कमेंट करीत विचारलं. आई मलायकाबरोबरचा अरहाननं शूट केलेला हा एपिसोड १७ फेब्रुवारीला ‘डंब बिरयानी’च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, अरहान हा अरबाज आणि मलायकाचा मुलगा आहे. त्याचा जन्म नोव्हेंबर २००२ मध्ये झाला. १९९८ रोजी मलायका आणि अरबाज लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या १९ वर्षांनंतर २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

हेही वाचा… “लग्नानंतरचं सुख”, पत्नी क्षितिजाने केली प्रथमेश परबच्या डोक्याची मालिश, अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

अरबाजनं आता मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी लग्न केलं आहे. दोघांनी डिसेंबर २०२३ मध्ये त्याची बहीण अर्पिताच्या घरी लग्नगाठ बांधली. तर, मलायका अभिनेता अर्जुन कपूरला अनेक वर्षांपासून डेट करीत आहे.

हेही वाचा… “हा काय वेडा झालाय का?”, ‘त्या’ फोटोमुळे अंकिताचा पती विकी जैन झाला ट्रोल

‘डंब बिरयानी’ चॅनेलवर या सीरिजचे सहा एपिसोड असणार आहेत. त्यात सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान, मलायका अरोरा आणि बरेच काही यांसारखे पाहुणे असतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arhaan khan asked mom malaika arora when is she getting married she asked son about virginity dvr