scorecardresearch

Pathan Box Office Collection : ‘पठाण’ चित्रपटाने मोडला ‘KGF 2’ चा रेकॉर्ड, तिसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

पठाणच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे आकडे समोर आले आहेत.

pathan-4
पठाण

Pathan Box Office Collection : बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खान हा सातत्याने चर्चेत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता पठाणच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे आकडे समोर आले आहेत.

बुधवारी २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटींचा गल्ला जमवला होता. यानुसार पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने १२७.५० कोटींची कमाई केली. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही ‘पठाण’ची क्रेझ कायम पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट पाहिल्यानंतर हृतिक रोशनने केले ट्वीट, म्हणाला “फारच…”

मिळालेल्या माहितीनुसार, पठाण चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ३४.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र अद्याप अंतिम आकडे समोर आलेले नाही. तर काही ठिकाणी पठाणने तिसऱ्या दिवशी जवळपास ४१ कोटींची कमाई केल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात १६२ कोटींचा व्यवसाय केला आहे.

तर जगभरात या चित्रपटाने २८० ते २९० कोटींच्या कमाईचा आकडा पार केल्याचे बोललं जात आहे. तर येत्या विकेंडला हा चित्रपट ४०० कोटींचा गल्ला जमवले, असे बोललं जात आहे.

आणखी वाचा : “अनेक समज” ‘पठाण’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून राम गोपाल वर्मांचे ट्वीट

विशेष म्हणजे पठाण चित्रपटाने दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या KGF Chapter-2 चा रेकॉर्डही मोडला आहे. पहिल्या तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून केजीएफ २ हा चित्रपट होता. पण पठाणने या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. KGF Chapter 2 या चित्रपटाला मागे टाकत पठाणने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आघाडी घेतली आहे. केजीएफ २ या चित्रपटाने तीन दिवसांत १४३.६४ कोटी कमावले होते. तर शाहरुख खानच्या पठाणने तीन दिवसात १६२ कोटींची कमाई केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 09:33 IST