इशान खट्टरचा 'पिप्पा' चित्रपट अमेझॉन प्राइमवर १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये एक १०० वर्षे जुनं गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे. प्रख्यात बंगाली कवी काझी नजरुल इस्लाम यांच्या 'करार ओई लुहो कोपट' या लोकप्रिय देशभक्तीपर गाण्यावर आधारित हे गाणं आहे. एआर रहमान यांनी रिक्रिएट केलेल्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पण या गाण्यावरून वादही सुरू झाला आहे. त्या वादावर निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वाद का झाला? संगीतकार ए. आर. रहमान यांनी चित्रपटात हे प्रसिद्ध गाणे एका नवीन रूपात सादर केले आहे, पण काही दिवसांपूर्वी यावरून वाद सुरू झाला. कवी काझी नजरुल इस्लाम यांचे नातू आणि चित्रकार काझी अनिर्बान यांनी दावा केला की कुटुंबाने निर्मात्यांना गाणं वापरण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांना सूर आणि ताल बदलण्याची परवानगी दिली नव्हती. https://www.instagram.com/reel/CzGKmsxSLHx/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== १७ वर्षांचा भाऊ गमावला, उदरनिर्वाहासाठी शेंगदाणे विकले; ३३ वर्षे चाळीत राहणाऱ्या अभिनेत्याने सांगितल्या जुन्या आठवणी वादावर निर्मात्यांनी दिलं स्पष्टीकरण आरएसव्हीपी आणि रॉय कपूर फिल्म्स निर्मित 'पिप्पा' च्या टीमने एका निवेदनात म्हटलं आहे की टीमला या गाण्याची मूळ निर्मिती, कवी इस्लाम आणि भारतीय उपखंडातील संगीत, राजकीय आणि सामाजिक परिदृश्यातील त्यांच्या अफाट योगदानाबद्दल खूप आदर आहे. तसेच बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे गाणे तयार करण्यात आल्याचे टीमने सांगितले. “करार ओई लुहो कोपट या गाण्याभोवती सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 'पिप्पा' चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि संगीतकार हे स्पष्ट करू इच्छितात की आम्ही सादर केलेलं गाणं ही एक प्रामाणिक कलात्मक व्याख्या आहे. काझी नजरुल इस्लाम यांच्या नातेवाईकांकडून याबाबात अधिकार मिळविल्यानंतर ते तयार केले गेले. प्रेक्षकांची मूळ रचनेशी असणारी भावनिक जोड आम्हाला समजते. पण तरीही आमच्या गाण्याने भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा त्रास झाला असेल तर आम्ही मनापासून माफी मागत आहोत," असं 'पिप्पा'च्या टीमने म्हटलं आहे. दरम्यान, हे गाणे १९२२ मध्ये 'बांग्लार कथा' (बंगालच्या कथा) या मासिकात सर्वात आधी प्रकाशित झाले होते. नंतर कवी इस्लाम यांच्या 'भांगर गान' या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले. हे पहिल्यांदा १९४९ मध्ये एका प्रसिद्ध संगीत कंपनीने आणि नंतर १९५२ मध्ये दुसर्या कंपनीने रेकॉर्ड केले होते.