अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. मागच्या महिन्यामध्ये ती संयुक्त राष्ट्र महासंघाच्या कार्यक्रमांसाठी न्यूयॉर्कमध्ये वास्तव्याला होती. प्रियांका UNICEF च्या बालहक्क विभागाची गुडविल अ‍ॅम्बेसिडर आहे. त्यामुळे तिला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यासंबंधित कामे करावी लागतात, कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून महासंघाची बाजू मांडावी लागते. सध्या UNICEF तर्फे केनिया सारख्या आफ्रिकन देशांमध्ये सर्वेक्षण सुरु आहे. या कामांमध्ये मदत करण्यासाठी ती केनियाला रवाना झाली आहे.

प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती या माध्यमाद्वारे तिच्या आयुष्यातले अपडेट्स चाहत्यांना देत असते. केनिया दौऱ्याची सुरुवात झाल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर एक महत्त्वपूर्ण माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओच्या सुरुवातीला ती म्हणाली, “मी सध्या खूप अस्वस्थ आहे. माझ्या मनामध्ये सुरु असलेल्या असंख्य विचारांमुळे मला एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं अशक्य झालंय. मी खिन्न अंतकरणाने तुमच्याशी संवाद साधतेय. न्यूयॉर्कवरुन मी जेव्हा केनियाला जाण्यासाठी निघाले अगदी तेव्हापासून माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु आहे. आम्ही (मी आणि UNICEF टीम) केनियामधील गंभीर स्थितीचा आढावा घेत आहोत. एक आई म्हणून या गोष्टी अनुभवणं खूप कठीण आहे.”

आणखी वाचा – आलिया भट्ट गिरगावमधील ‘या’ रुग्णालयात देणार बाळाला जन्म, माहिती आली समोर

वातावरणामध्ये सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आफ्रिका खंडातल्या अनेक देशांमध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे तेथे बऱ्याच वर्षांपासून दुष्काळ पडला आहे. परिणामी तेथील लहान मुलांना याचा त्रास होत असल्याचे प्रियांकाने सांगितले. तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तेथील परिस्थितीची माहिती दिली.

आणखी वाचा – “हमको साथी मिल गया…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने दिली प्रेमाची कबुली

पुढे तिने तेथील समस्यांवर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासंघाद्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजना यांविषयी सांगितले. ती म्हणाली, “काही दिवसांपासून मी UNICEF द्वारे सुरु असलेल्या उपक्रमांमध्ये भाग घेत आहे. केनियासारख्या अन्य देशांमधील लहान मुलांचे हाल होऊ नये म्हणून टीम खूप मेहनत घेत आहे. त्यांच्या प्रयत्नांना तुमची साथ हवी आहे. माझ्या बायोमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही त्यांना आर्थिक मदत करु शकता. या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये पैसा हा खूप महत्त्वपूर्ण घटक आहे.”