पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून अमृतपाल सिंग हे नाव चर्चेत आलं आहे. ‘वारिस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या असणारा अमृतपाल सिंग सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. यामुळे पंजाबमध्ये गदारोळ पाहायला मिळत आहे. याबाबत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने ट्वीट करत पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांझला लक्ष्य केलं होतं.

कंगनाने सोशल मीडियावरील एक व्हायरल मीम शेअर करत दिलजीतला टोला लगावला होता. ट्विटर आणि इंस्टाग्राम स्टोरीमध्ये स्वीगीची एक पोस्ट शेअर करत कंगनाने “दिलजीत दोसांझ जी पोल्स आ गई पोल्स,” असं लिहिलं होतं. याबरोबरच ‘खलिस्तान’ असं लिहून त्यावर क्रॉस मार्क केलं होतं. कंगनाने याबरोबरच अजून एक पोस्ट शेअर केली होती. “खलिस्तानींना पाठिंबा देणाऱ्या सर्वांनी लक्षात ठेवा, पुढचा नंबर तुमचा आहे, पोल्स आले आहेत आणि ही ती वेळ नाही जेव्हा कोणी काहीही करायचं”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

हेही वाचा>> Smriti Irani Birthday: एकेकाळी वेटरचं काम करायच्या स्मृती इराणी, मालिकेत काम मिळाल्यानंतर नशीबच बदललं; भाजपात प्रवेश केला अन्…

kangana-2

“देशाशी गद्दारी केली किंवा तो तोडण्याचा प्रयत्न केल्यास महागात पडेल. पुढचा नंबर तुमचाच आहे, पोलीस पण इथेच आहे. आता कुणालाही वाट्टेल ते करता येणार नाही. जर तुम्हाला देशाची फसवणूक करायची असेल किंवा त्याचे तुकडे करायचे असतील तर तुम्हाला खूप वेळ लागेल,” असंही पुढे कंगना म्हणाली होती. कंगनाच्या या धमकीवजा ट्वीटवर पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांझने उत्तर दिलं आहे.

हेही वाचा>> श्रेया बुगडेने शेअर केले गुढीपाडवा सेलिब्रेशनचे फोटो, अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
diljit dosanjh

दिलजीतने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये “माझं पंजाब सदैव बहरत राहू दे” असं पंजाबीमध्ये लिहिलं आहे. याबरोबरच त्याने हात जोडलेले इमोजीही पोस्ट केले आहेत. दिलजीतचं हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे. दरम्यान, पंजाब पोलिसांनी शनिवारी(१८ मार्च) अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांविरोधात मोहीम सुरू केली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ११४ जणांना अटक करण्यात आली असून अमृतपालचा शोध घेतला सुरू आहे.