महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्ट सध्या विशेष चर्चेत आला आहे. राहुल भट्टने त्याची सावत्र बहीण आलिया भट्टबद्दल नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला. राहुल नुकताच एका मुलाखतीत भट्ट कुटुंबातील सदस्यांबद्दल बोलताना दिसला. यावेळी त्याने आलिया, पूजा व महेश भट्ट यांच्याबद्दल वक्तव्य केलं. त्याने त्या मुलाखतीत आलियाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला.

राहुलने नुकतीच ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्याने आलियाबद्दल बोलताना असे म्हटले की, “आलिया माझी सख्खी बहीण पूजा भट्ट इतकी प्रतिभावान अभिनेत्री नाही, ती पूजासमोर चाय कम पाणी आहे. आलियाने नाही तर पूजाने खऱ्या आर्थाने माझ्या बाबांचा अभिनयाचा वारसा पुढे नेला आहे. ती ९०च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. सौंदर्य, कला, अभिनय या सर्व गोष्टींमध्ये पूजा आलियापासून खूप पुढे आहे”. तर पूजाची तुलना आलियाबरोबर कधीच होऊ शकत नाही.” असेदेखील त्याने म्हटले आहे.

यासह मुलाखतीत राहुलला त्याचे वडील महेश भट्ट व बहीण पूजा भट्टबद्दल विचारण्यात आलं होत. राहुलला, “खूप पुर्वी पूजा व महेश यांचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्याची माध्यमांसह लोकांमध्येही बरीच चर्चा रंगली होती. त्या फोटोबद्दल तुला काय बोलावंसं वाटतं”, असे विचारण्यात आले होते. त्यावर त्याने “इंडस्ट्रीत लहानाच्या मोठ्या झालेल्या मुलांना याची सवय असते. आम्ही लहानपणापासून मोर्चे, मारामारी, रेड यांसारखे कित्येक प्रसंग पाहिलेले, अनुभवलेले असतात. त्यामुळे कुठल्याही अफवांमुळे आम्हाला फरक पडत नाही. मी लहान असताना हे फोटोज व्हायरल झाले होते तेव्हा मी १३ वर्षांचा वगैरे होतो; पण हे सगळं खोटं आहे. लोक काहीही बोलतात.”

यासह राहुल अभिनेता रणबीर कपूरबद्दलही बोलताना दिसला. रणबीरबद्दल बोलताना तो म्हणाला की, “रणबीर कलाकार म्हणून कसा आहे यापेक्षा तो एक वडील म्हणून उत्तम आहे याचा मला जास्त आनंद आहे. तो नेहमीच त्याच्या मुलीची काळजी घेताना दिसतो. तसेच रणबीर जोडीदार म्हणूनही चांगला आहे.”

दरम्यान, राहुल भट्ट हा प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट व किरण भट्ट यांचा मुलगा आहे. राहुल भट्ट अभिनय क्षेत्रात सक्रिय असून, तो सेलिब्रिटींचा फिटनेस ट्रेनी म्हणूनही काम करतो. नुकतीच त्याने ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटासाठी अभिनेता कार्तिक आर्यनला ट्रेनिंग दिली होती. राहुल ‘ब्लॅक वॉरंट’ या नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये झळकला होता.