राखी सावंतची आई जया यांचं शनिवारी निधन झालं. मागच्या बऱ्याच काळापासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते. जया यांना कॅन्सर आणि ब्रेन ट्युमर होता. मात्र शनिवारी संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राखी सावंतने स्वतः या वृत्ताची पुष्टी केली होती. आईच्या अखेरच्या दिवसांमध्ये राखी तिच्याबरोबर होती. पण त्यांच्या निधनानंतर राखीची अवस्था खूपच बिकट झाली आहे. तिचा एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

आईचं पार्थिव रुग्णालयातून बाहेर नेत असताना राखी सावंत ढसाढसा रडताना दिसली. रुग्णालयातील राखीचा व्हिडीओ समोर आला असून त्यात ती जोरजोरात अक्रोश करून रडताना दिसत आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात राखी सावंत आईचं पार्थिव घेऊन बाहेर निघत असताना दिसत आहे.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
dombivli, nandivali, dombivli crime news
डोंबिवलीत नांदिवली येथे पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, पत्नी सतत मोबाईलवर बोलत असल्याच्या संशयातून चाकू हल्ला

या व्हिडीओमध्ये राखी सावंत खूपच भावुक झाल्याचं दिसत आहे. ती खूप प्रयत्नांनी स्वतःला सांभाळताना आणि आक्रोश करून रडताना दिसत आहे. रडत रडत ती आपल्या आईला हाक मारत असल्याचंही दिसत आहे. राखी सावंतला अशा अवस्थेत पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच भावुक झालेले दिसत आहेत. एवढंच नाही तर या व्हिडीओवर कमेंट करताना नेटकऱ्यांनीही राखीच्या आईसाठी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा- Rakhi Sawant Mother Died : अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे निधन

दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीलाच राखी सावंतने तिच्या आईला ब्रेन ट्यूमर असल्याचा खुलासा केला होता. त्यासाठीच ती बिग बॉस मराठीच्या घरातून लवकर बाहेर पडली होती. आईच्या तब्येतीबद्दल बोलताना राखी म्हणाली होती, “माझी आई ठीक नाहीये. ती रुग्णालयात आहे. आणि मला खरंच तुम्हा सर्वांच्या आशीर्वादांची गरज आहे. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा.”