scorecardresearch

Video: आदिल खानशी वाद झाल्यावर लव्ह-जिहादचा उल्लेख करताच संतापली राखी सावंत; म्हणाली…

राखी सावंतने आदिल खानशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता, तसेच स्वतःचं नावही फातिमा ठेवलं होतं.

rakhi sawant love jihad
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर लग्न केलं होतं, पण ती बिग बॉस मराठीमध्ये गेल्यावर आदिल तनू नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. त्यानंतर राखीने तिच्या लग्नाची बातमी उघड केली. आधी लग्न स्वीकारण्यास नकार देणाऱ्या आदिलने नंतर लग्न स्वीकारलं, त्याच काळात राखीच्या आईचं निधन झालं.

राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला अटक

राखीच्या आईच्या निधनानंतर आदिलने राखीचं घर सोडलं आणि तो गर्लफ्रेंड तनूबरोबर राहू लागला. राखीने त्याला तिच्याशी नातं संपवून परत येण्यास सांगितलं, पण आदिलने नकार देत तनूला निवडलं. त्यानंतर या दोघांमधील वाद चांगलाच वाढला आणि आदिलने मारहाण केल्याची तक्रार राखीने पोलिसांना दिली. मग पोलिसांनी आदिलला अटक केली.

Video: आदिल खान गुन्हेगार? राखी सावंतनेच केला पतीबद्दल गौप्यस्फोट; म्हणाली, “म्हैसूर पोलीस…”

राखी सावंतने आदिल खानशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता, तसेच स्वतःचं नावही फातिमा ठेवलं होतं. आता दोघांमधील वादानंतर राखीला लव्ह जिहादबद्दल विचारल्यावर ती चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळालं. “मी स्वतः एक मुस्लीम आहे. मी इस्लाम कबूल केला आहे. कोणीही हिंदू-मुस्लीमवरून या प्रकरणात काहीच बोलणार नाही” असं म्हणत राखी सावंत रागात निघून गेली.

दरम्यान, राखी सावंतचा भाऊ राकेश यानेही आदिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. ज्या दिवशी आईचं निधन झालं त्या दिवशी त्याने राखीला खूप मारलं होतं. आम्ही तिला रुग्णालयात नेलं आणि मग आईचे अंत्यसंस्कार केले होते, असा दावा राखीच्या भावाने केला होता. सध्या आदिल पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी केली जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 08:34 IST