ड्रामी क्वीन राखी सावंतच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून खूपच ड्रामा सुरू आहे. आईच्या निधनानंतर दुःखात असलेली राखी पती आदिल खानमुळे जास्तच चर्चेत आहे. आदिलचं अफेअर असून त्याने राखीचं घर सोडलं आहे. सुरुवातीला वाद झाल्यानंतर दोघेही एकत्र आले होते, पण आता मात्र राखी आणि आदिल वेगळे होतील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

राखी सावंतने माध्यमांसमोर येत पती आदिल खानवर काही गंभीर आरोप केले आहेत. राखीने आदिल खानच्या गर्लफ्रेंडचं नावही लोकांसमोर उघड केलं आहे. आदिल तनू नावाच्या मुलीच्या प्रेमात असून तिच्यासाठी आपल्याला सोडत असल्याचं राखी म्हणाली. याशिवाय आदिलने मारहाण केल्याचंही राखीने सांगितलं.

आदिल खानविरोधात कर्नाटकमधील म्हैसूर इथं अनेक गुन्हे दाखल असल्याचं राखीने सांगितलं. आदिलला पोलीस १ तारखेला उचलून घेऊन गेले होते. त्याला म्हैसूरमध्ये दोन दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्याच्याविरोधात तिथं अनेक गुन्हे दाखल आहेत, असा दावा राखी सावंतने केला.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आदिल गर्लफ्रेंड तनूबरोबर राहत आहे. त्याने राखीला गिफ्ट केलेली गाडीही परत घेतली आहे. आदिलने फसवणूक केल्याचे आणि मारहाणीचे आरोपही तिने केले आहेत. या सर्व आरोपांवर आदिल खानकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.