Ranbir Kapoor Becomes Highest Paid Actor In Ramayana : लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘रामायण’ हा भारतातील सर्वाधिक महागडा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये रणबीर कपूरसह अभिनेता यश आणि साई पल्लवी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहेत. या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित होणार आहेत. याचा पहिला भाग २०२६ मध्ये दिवाळीदरम्यान प्रदर्शित होणार आहे.

निमित मल्होत्रा यांची निर्मिती असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचं एकूण बजेट ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार १६०० कोटी इतकं आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात निर्मात्याने ९०० कोटींची गुंतवणूक केली आहे तर दुसऱ्या भागासाठी ७०० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. ‘रामायण’ चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे, त्यामुळे या कलाकार मंडळींनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकांसाठी किती रुपयांचं मानधन घेतलं आहे जाणून घेऊ.

‘रामायण’मध्ये रामाची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूर एकूण १५० कोटी रुपये इतकं मानधन घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याची विभागणी पहिल्या भागासाठी ७५ कोटी तर दुसऱ्या भागासाठीसुद्धा ७५ कोटी रुपये अशा दोन टप्प्यात होणार आहे.

रणबीरसह या चित्रपटात अभिनेत्री साई पल्लवी महत्त्वाच्या भूमिकेतून झळकणार आहे. ती यामध्ये सीतेची भूमिका साकरणार असून यासाठी ती पहिल्या आणि दुसऱ्या भागासाठी ६-६ कोटी असं एकूण १२ कोटी इतकं मानधन घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.

रणबीर कपूर, साई पल्लवी यांच्यासह चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा दाक्षिणात्य अभिनेता यश ‘रामायण’मधील त्याच्या भूमिकेसाठी पहिल्या भागासाठी ५० कोटी तर दुसऱ्या भागासाठीसुद्धा ५० कोटी असं एकूण १०० कोटींचं मानधन घेणार असल्याचं म्हटलं जात आहे; तर काही माध्यामांच्या वृत्तानुसार यश रणबीर कपूरपेक्षाही जास्त २०० कोटी रुपयांचं मानधन घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितेश तिवारी दिग्दर्शित व निमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह अभिनेते अरुण गोविल, सनी देओल, रवी दुबे, आदिनाथ कोठारी, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंह यांसारखे इतर काही कलाकार झळकणार आहेत. नुकताच ३ जुलै रोजी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यानंतर सोशल मीडियासह सर्वत्र या चित्रपटाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली.