बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या अलीकडेच रिलीज झालेल्या ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. या चित्रपटात रणबीरने ‘मिकी’ ही भूमिका साकारली आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’मध्ये ‘मिकी’ करत असलेल्या अनेक व्यवसायांमध्ये जोडप्यांचे ब्रेकअप करून देणे या बिझनेसचासुद्धा समावेश असतो. यासंदर्भात रणबीरला एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आले. अलीकडेच रणबीरने नेटफ्लिक्सच्या ‘ऑकवर्ड इंटरव्ह्यू’मध्ये हजेरी लावली होती, या वेळी त्याने अनेक गोष्टींबाबत खुलासे केले आहेत.

‘तू झुठी मैं मक्कार’मधील ‘मिकी’ या पात्राप्रमाणे खऱ्या आयुष्यातसुद्धा तू कोणत्या जोडप्याचा ब्रेकअप करून देण्यात मदत केलीस का? असा प्रश्न यूट्यूबर ऐश्वर्या मोहनराजने ‘ऑकवर्ड इंटरव्ह्यू’मध्ये रणबीर कपूरला विचारला. यावर अभिनेता जुनी आठवण सांगत म्हणाला, “मी शाळेत वगैरे असताना माझ्या अनेक मित्रांना ब्रेकअपचा सल्ला दिला होता. मात्र हे सगळे मित्र स्वत:हून त्यांच्या रिलेशनशिपमधून बाहेर पडू इच्छित होते. तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल किंवा तुमचे तुमच्या जोडीदारावर प्रेम नसेलही, परंतु कोणत्याही परिस्थिती तुम्ही इमानदार राहिले पाहिजे, असा सल्ला मी मित्रांना द्यायचो. पण, मित्रांना सल्ला देण्यासाठी मी अशी खास योजना नव्हती केली.”

हेही वाचा : “पैसे आल्यानंतर आम्ही ‘मन्नत’ बंगला खरेदी केला, पण…” शाहरुखने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “मी गौरीला…”

रणबीरला यापूर्वी करीना कपूरच्या ‘व्हॉट वुमन वॉंट’ कार्यक्रमात तू कोणासोबतच्या नात्यात ‘मक्कार’ होतास का? असा प्रश्न विचारला होता. या वेळी अभिनेत्याने उत्तर दिले की, “हो, नात्यात अनेकदा मी अशा गोष्टी केल्या आहेत, परंतु जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा हळूहळू तुम्हाला जाणीव होते, कोणतेही नाते टिकवण्यासाठी त्यात खरेपणा असला पाहिजे.”

हेही वाचा : अनुष्का शर्माच्या बाईक सवारीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; थेट मुंबई पोलिसांना टॅग करीत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणबीर कपूर लवकरच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा करीत आहेत.