बॉलिवूडमधील अफेअर हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर व चंकी पांडेंची लेक अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. आदित्य रॉय कपूर अनन्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांवर आदित्य किंवा अनन्याने अद्याप कोणतेही भाष्य केलेलं नाही. पण त्यांना अनेकदा पार्टीत एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य रॉय कपूर व अनन्या पांडेच्या अफेरच्या चर्चांवर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने नेटफ्लिक्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे. रणबीर म्हणाला, “आदित्य नेहमी माझ्या बरोबर असतो. तो खूप मस्ती करतो. त्याला एक मुलगी आवडते, हेही मला माहीत आहे. तिचं नाव ‘A’ या अक्षरापासून सुरू होतं.” रणबीरच्या या वक्तव्यानंतर ‘अ’ अक्षरापासून सुरू होणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अनन्या पांडेच असल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा>> “प्रेम एकदाच होतं ना?”, परिणीती चोप्राशी साखरपुडा केल्यानंतर राघव चड्ढा यांचा संसदेतील ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, रणबीर कपूर त्याच्या ‘तू झुठी मै मक्कार’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसह स्क्रीन शेअर केली आहे. रणबीर अॅनिमल चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor talk about aditya roy kapoor and ananya pandey dating rumors kak
First published on: 16-05-2023 at 17:45 IST