गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट प्रदर्शित झाले. यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला तर काहींकडे पाठ फिरवली. तर आता ‘रामायण’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटासाठी रणबीर कपूर चांगलीच मेहनत घेत आहे.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी रणबीर कपूर प्रचंड मेहनत घेत आहे. तर या भूमिकेसाठी तयारी करताना तो त्याच्या आयुष्यातील अनेक सवयींचा त्याग करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Biographies The film Srikanth tells the story of the struggle of a stubborn young man
श्रीकांत : एका जिद्दीची हृदयस्पर्शी कथा
chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
Nach Ga Ghuma Movie poster
नाच गं घुमा! मोलकरणीचंच नाही माणुसकीचं ‘मोल’ सांगणारा चित्रपट
swargandharva sudhir phadke movie review by loksatta reshma raikwar
Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान
Raj Thackeray Told About Film Shakti
राज ठाकरेंचं चित्रपट प्रेम आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘शक्ती’ सिनेमातील प्रसंगाचा ‘तो’ किस्सा
Marathi actor Prasad Oak expressed a clear opinion about Marathi films not getting prime time shows
“शिंदे सरकारच मल्टीप्लेक्सवाल्यांचा माज उतरवेल”, मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो न मिळण्याबाबत प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला…
Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर

आणखी वाचा : रणबीर कपूरने भाड्याने दिला त्याचा पुण्यातील आलिशान फ्लॅट, एका महिन्याचं भाडं वाचून व्हाल थक्क

रामायण या चित्रपटात श्रीरामांची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरने त्याच्या जीवनशैलीत खूप बदल करण्याचं ठरवलं आहे. ‘कोईमोई’च्या वृत्तानुसार, श्रीरामांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी रणबीर या चित्रपटाचा शूटिंग होईपर्यंत दारू पिणं आणि मांसाहार करणं पूर्णपणे बंद करणार आहे. रणबीर कपूरला या काळात श्रीरामांसारखी शुद्ध आणि पवित्र जीवनशैली जगायची असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. याबरोबरच तो लेट नाईट पार्टीही सध्या करत नाहीये असंही म्हटलं जात आहे.

हेही वाचा : “भाज्या, प्रोटीन शेक अन्…” उत्तम शरीरयष्टीमागे रणबीर कपूरची मोठी मेहनत, केला ‘या’ पदार्थांचा त्याग

मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगला रणबीर कपूर आणि साई पल्लवी पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सुरुवात करतील. तर या चित्रपटाच्या पहिल्या भागाचं शूटिंग ऑगस्टपर्यंत संपेल असं समोर येत आहे. तर या चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रीराम आणि सीता यांच्या नात्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.