रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची जोडी बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांनी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये अभिनेत्रीने तिची गोंडस लेक राहाला जन्म दिला. राहाच्या जन्मानंतर कपूर कुटुंबीयांच्या घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. सध्या रणबीर आणि आलिया त्यांच्या प्रत्येक मुलाखतींमध्ये राहाबद्दल भरभरून बोलताना दिसतात. तिचं कौतुक करत असतात. अशातच रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून ‘रामायण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाची कथा, स्टारकास्ट याबद्दल गेली अनेक दिवस चर्चा चालू आहे. अशातच ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीरच्या एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो २५ व्या दिवसाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. यामध्ये रणबीरने एक खास टी-शर्ट परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “माझी बहीण, सखी, मैत्रीण”, तेजस्विनी पंडितच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; म्हणाली, “तेजू आयुष्यभर…”

प्रसिद्ध डिझायनर रिंपल नरुलाने रणबीर कपूरबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघंही एकत्र पोज देत असल्याचं पाहायल मिळत आहे. रिंपलने या फोटोला “रामायण शूटिंग २५ वा दिवस” असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये रणबीरने गुलाबी रंगाच्या टीशर्टवर ‘राहा’ नाव लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. रणबीरचं हे कस्टमाइज टी-शर्ट सध्या सर्वत्र चर्चेत आलं आहे. याआधी सुद्धा अनेकवेळा अभिनेत्याने त्याचं राहावर किती प्रेम आहे हे जाहीरपणे सांगितलं आहे.

हेही वाचा : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात समांथा प्रभूची जागा घेणार ‘ही’ अभिनेत्री? रणबीर कपूरसह इंटीमेट सीन देऊन रातोरात झाली नॅशनल क्रश

हेही वाचा : ‘बिग बॉस ओटीटी’मधून सलमान खानचा पत्ता कट? होस्ट म्हणून ‘या’ अभिनेत्याच्या नावाची चर्चा, पाहा प्रोमो

रणबीर कपूरने गुलाबी रंगाच्या टी-शर्टवर काळ्या अक्षरात ‘राहा’ हे आपल्या लेकीचं नाव लिहिलं आहे. या नावाच्या खालोखाल एक छोटासा अ‍ॅनिमेटेड बेबी पांडा देखील काढण्यात आला आहे. सध्या अभिनेत्यावर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला ‘रामायण’ चित्रपट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये रणबीर प्रभू श्रीराम, तर सीता मातेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी झळकणार आहे. याशिवाय केजीएफ स्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.