दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाटत पाहत आहेत. चित्रपटाच्या टीझर, गाण्यामुळे प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण अशातच चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

‘पुष्पा: द राइज’ चित्रपटात अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने आपल्या जबरदस्त डान्स, अदाकारीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चित्रपटातील तिचं ‘ऊ अंटवा’ या आयटम साँगने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. पण आता ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातून समांथाचा पत्ता कट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. समांथाची जागा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री घेणार आहे.

‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील आयटम साँगमध्ये झळकणार असणारी बॉलीवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री एका इंटीमेट सीनमुळे रातोरात नॅशनल क्रश झाली. ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात तिने रणबीर कपूरसह इंटीमेट सीन दिला होता. त्यानंतर तिला बऱ्याच चित्रपटाच्या ऑफर आल्या. आतापर्यंत ही अभिनेत्री कोण असेल? हे लक्षात आलंच असेल.

हेही वाचा – Video: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडची ‘या’ लोकप्रिय मालिकेत दमदार एन्ट्री, पाहा व्हिडीओ

बॉलीवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तृप्ती डिमरी आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली तृप्तीची वर्णी ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटात लागल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत ‘तेलुगू ३६०’ या एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटात अल्लू अर्जुनबरोबर तृप्ती डिमरी डान्स करताना दिसणार असल्याचं पोस्टमधून सांगण्यात आलं आहे. तसंच समांथा प्रभूची जागा तृप्ती घेणार असल्याचं वृत्त देखील समोर आलं आहे.

तृप्तीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘अ‍ॅनिमल’नंतर तृप्तीला बऱ्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळत आहे. कार्तिक आर्यन बरोबर ती ‘भूल भुलैया ३’मध्ये झळकणार आहे. शिवाय करण जोहरच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटातही ती पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तृप्तीसह अभिनेत्री विकी कौशल आणि एमी विर्क झळकणार आहेत.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा बायकोबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “अरेरे बिचारा…”

दरम्यान, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट १५ ऑगस्ट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुकुमार यांनीच सांभाळली आहे. लवकरच या चित्रपटातील दुसरं गाणं प्रक्षेकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.