अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल हे जोडपं लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. दोघेही पहिल्यांदा ‘फुकरे’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते, नंतर ते प्रेमात पडले आणि त्यांनी २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या साथीत लग्न केलं होतं. नंतर दोन वर्षांनी २०२२ मध्ये त्यांनी त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. रिचा आणि अली वेगवेगळ्या धर्माचे आहेत. नुकतंच रिचाला तिच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल विचारण्यात आलं.

रिचाने सांगितलं की तिने व अलीने लग्नाचा निर्णय घेतल्यावर टीका करणारे बरेच होते. पण कोणीही फिल्टर लावून प्रेमात पडत नाही, असं ती म्हणाली. “जर तुम्ही तुमच्या निवडीवर ठाम असाल आणि तुमचे जवळचे कुटुंबीय निर्णयात तुमच्या पाठीशी असतील तर इतर कोणाचं मत महत्त्वाचं नाही. आणि जसं मी म्हणाले, माणूस हा सर्वात आधी माणूस असतो. जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा कोणतेही फिल्टर अडसर ठरत नाहीत. जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा मनात फक्त प्रेम असतं,” असं रिचा ‘गॅलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

अमिताभ बच्चन यांच्याशी खरं बोलल्यामुळे ‘पंचायत’च्या प्रल्हादचाने गमावलेली नोकरी, स्वतःच केला खुलासा

रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ते दोघे कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायचे, याबद्दल रिचाला विचारण्यात आलं. यावर कुटुंबियांना अलीबद्दल माधम्यांद्वारे कळू नये, असं आपल्याला वाटत होतं असं तिने सांगितलं. “माझ्या कुटुंबाला माध्यमांकडून माझ्या नात्याबद्दल कळावं असं मला वाटत नव्हतं. आमचीही कुटुंबे आहेत. जेव्हा मी याबद्दल माझ्या घरी कुटुंबाबरोबर चर्चा करण्यास तयार होते, तेव्हा मी ठरवलं की आता मी अलीबरोबर बाहेर पडेन,” असं रिचा म्हणाली.

स्मिता पाटील यांच्या कांजीवरम साड्यांपासून बनवलेला ड्रेस घालून लेक प्रतीक पोहोचला Cannes मध्ये, पाहा खास Photos

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिचा म्हणाली की व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये व्हिक्टोरिया आणि अब्दुलच्या प्रीमिअरसाठी जेव्हा तिला अलीसोबत प्रवास करायचा होता तेव्हा त्या दोघांनी नातं जगजाहीर करण्याचा निर्णय घेतला. अली व रिचा यांनी जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. रिचाने आधी सांगितलं होतं की तिने व अलीने २०२० मध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केलं होतं. करोना काळात लग्न केल्याने त्याबद्दल कोणालाच माहीत नव्हतं. त्यानंतर दोघांनी २०२० मध्ये त्यांनी मित्र व कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. या दोघांच्या लग्नातील फोटो व व्हिडीओ खूप चर्चेत होते. आता लग्नानंतर चार वर्षांनी ते दोघेही आई-बाबा होणार आहेत. हे दोघेही लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.