अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जातात. दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. जिनिलिया आणि रितेश अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करतात जे व्हायरल होतात. रितेश आणि जिनिलियाच्या लग्नाला आता जवळपास १० वर्षं झाली आहेत. अशात आता जिनिलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात जिनिलियाने रितेशला त्याच्याशी लग्न करण्याचं मजेदार कारण सांगितलं आहे.

जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात रितेश देशमुख जिनिलियाला त्याच्याशी लग्न करण्याचं कारण विचारताना दिसत आहे. रितेश तिला विचारतो, “मला एक सांग, तू माझ्यात असं काय पाहिलंस जे माझ्याशी लग्न करायला तयार झालीस?” रितेशच्या या प्रश्नावर जिनिलियाने खूपच मजेदार उत्तर दिलं. ज्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
Kangana Ranut Old Video viral
“कंगना, तू उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं त्याचं काय?”, अश्लील पोस्ट प्रकरणानंतर ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
why arrest arvind kejriwal excise case
विश्लेषण : दिल्लीतील मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवालांचे नाव नाही, तरीही मनी लाँडरिंग अंतर्गत कारवाई का?
viral video street vendor selling momo burger
Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित

आणखी वाचा-Video : लेडीजच फर्स्ट का? जिनिलिया देशमुखचा ‘तो’ व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर

रितेशच्या प्रश्नाचं उत्तर देताना जिनिलिया म्हणते, “मी तुला एकदा माझ्या घराच्या बाल्कनीतून तुला कपडे धुताना आणि भांडी घासताना पाहिलं होतं.” जिनिलियाने दिलेल्या मजेदार उत्तरामुळेच या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट केल्या आहेत. व्हिडीओ शेअर करताना जिनिलियाने, “लव्ह अॅट फर्स्ट वॉश” असं कॅप्शन दिलं आहे.

आणखी वाचा- जिनिलिया देशमुखला नवऱ्याकडून मिळाली ‘ही’ सर्वोत्तम भेट, अभिनेत्रीनेच केला होता खुलासा

दरम्यान जिनिलिया देशमुख सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असते. आपल्या मुलांबरोबर तसेच रितेशसह ती मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते. लवकरच ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.