अनंत अंबानींचा आज २९ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधील जामनगर इथं पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनंत अंबानींच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. या पार्टीत बी प्राक व सलमान खानने अनंतसाठी गाणं गायलं. या पार्टीतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अनंत अंबानींच्या वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. एका फोटोमध्ये अनंत, बी प्राक व सलमान खान एकत्र पोज देत आहेत. तर काही व्हिडीओंमध्ये सलमान व बी प्राक ‘सारी दुनिया मिटा देंगे’ हे अॅनिमलमधील गाणं एकत्र गाताना दिसत आहेत. याच गाण्याच्या धुनमध्ये ते अनंत अंबानींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्हिडीओत पाहायला मिळतंय.

सलमान खानला उचलू शकला नाही अनंत अंबानी, शेराला हाक मारली अन्…, प्री वेडिंगमधील ‘तो’ Video Viral

सलमान खान व्यतिरिक्त बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड ऑरी या वाढदिवसानिमित्त जामनगरला गेला होता. ऑरी व सलमान खान ८ एप्रिलला मुंबईहून जामनगरला जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते. आतापर्यंत समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हे दोघेच जामनगरला गेल्याचं दिसतंय.

अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनंत अंबानी सलमान खानचे चाहते आहेत. सलमानने अनंत व राधिका यांच्या प्री-वेडिंगला हजेरी लावली होती. तसेच डान्सही केला होता. यावेळी अनंतनी सलमान खानला उचलून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण उचलता आलं नाही मग शेराला आवाज देत त्यांनी सलमानला उचलून घेण्यास सांगितलं. प्री-वेडिंगमधील या व्हिडीओची खूप चर्चा झाली होती.