किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित झाला. दोन आठवड्यानंतरही या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत आणि सिनेसृष्टीतील अनेकजण हा चित्रपट पाहिल्यानंतर किरण रावचं कौतुक करत आहे. अनुराग कश्यपने सिनेमाचं कौतुक केल्यानंतर आता सलमान खाननेही ‘लापता लेडीज’ बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान खानने एक्सवर एक पोस्ट केली आहे, त्यात त्याने किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे. “नुकताच किरण रावचा ‘लापता लेडीज’ पाहिला. वाह वाह किरण. चित्रपट पाहून मला आणि माझ्या वडिलांनाही खूप आनंद झाला. दिग्दर्शक म्हणून पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन, छान काम केलं आहेस, आता माझ्याबरोबर कधी काम करणार?” असं सलमान म्हणाला.

allu arjun pushpa 2 The Rule movie first song pushpa pushpa promo out
Video: अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, अभिनेता म्हणाला…
Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा

प्रियांका चोप्राची बहीण झाली केजरीवालांची सून! मीराने ४० व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली…

‘लापता लेडीज’च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने सोमवारी ३० लाख आणि मंगळवारी ३६ लाख रुपयांचा व्यवसाय केला. चित्रपटाने १३ मार्च रोजी ३८ लाख रुपये कमावले. यासह ‘लापता लेडीज’चे एकूण कलेक्शन ९.७९ कोटी झाले आहे. ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात प्रतिभा रंता, नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन, छाया कदम यांच्यासह अनेक स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.