सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुचर्चित चित्रपट ‘टायगर ३’ ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. ‘टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ प्रमाणेच या चित्रपटातही प्रेक्षकांना सलमान खानचे अ‍ॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. अगोदरच्या दोन्ही चित्रपटांची कमाई पाहता ‘टायगर ३’सुद्धा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करेल अशी चर्चा सुरू आहे. मात्र, प्रदर्शनाच्या दिवशीच ‘टायगर ३’ ला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पण का? घ्या जाणून

हेही वाचा- व्हायरल ‘डीपफेक’ व्हिडीओनंतर रश्मिका मंदाना आली मीडियासमोर; ‘अशी’ होती अभिनेत्रीची अवस्था

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

प्रदर्शनाच्या दिवशीच चित्रपटाला बसू शकतो फटका

‘टायगर ३’ अगोदर १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, निर्मात्यांनी निर्णय बदलून चित्रपट १२ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्याचे जाहीर केलं. मात्र, निर्मात्यांच्या या निर्णयामुळे चित्रपटाच्या कमाईला धक्का बसेल की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. १२ नोव्हेंबरलाच क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध नेदरलॅंड सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्याचा फटका ‘टायगर ३’ला बसण्याची शक्यता आहे. तसेच ऐन दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे दिवाळी सोडून प्रेक्षक चित्रपट बघायला येतील की नाही, याबाबतही शंका व्यक्त करण्यात येत आहे.

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये जबरदस्त कमाई

भारतात ‘टायगर ३’च्या अ‍ॅडव्हॉन्स बुकिंगला ५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरुवात झाली. अ‍ॅडव्हॉन्स बुकिंग सुरू झाल्यापासून २४ तासांमध्ये ‘टायगर ३’ची सुमारे एक लाख ४० हजार तिकिटे विकली गेली होती. आत्तापर्यंत या चित्रपटाची २ लाख ६६ हजार ९९५ तिकिटे विकली गेली आहेत. अ‍ॅडव्हॉन्स बुकिंगच्या माध्यमातून चित्रपटाने ७.४६ कोटींचा व्यवसाय केला आहे.

हेही वाचा- “गोरा होण्यासाठी मी अनेकदा फेअरनेस क्रीम लावायचो, पण…”; नवाजुद्दीन सिद्दीकीने केला मोठा खुलासा; म्हणाला, “माझ्या रंगामुळे…”

दिल्लीच्या चित्रपटगृहांत २४ तास चालणार शो

नवी दिल्लीतील रिंग रोडमधील चित्रपटगृहांनी २४ तास ‘टायगर ३’ चे शो चालवणार असल्याचे जाहीर केले आहे. मध्यरात्री २ वाजल्यापासून या चित्रपटाचे शो आयोजित करण्यात येणार आहेत. देशातील अनेक भागांमधून चाहत्यांनी ‘टायगर ३’ चे २४ तास शो चालवण्याची मागणी केली आहे. तसेच दुबईतील वॉक्स सिनेमा चित्रपटगृहात रात्री १२.०५ वाजता ‘टायगर ३’चा शो आयोजित केला आहे. तर सौदी अरबमध्ये मध्यरात्री २ वाजता या चित्रपटाचे शो दाखवण्यात येणार आहे.

हेही वाचा- “टायगर बूढ़ा है बॉक्स ऑफिसवर…” प्रसिद्ध अभिनेत्याने उडवली भाईजानची खिल्ली; आमिर खानवरही केली टीका

‘टायगर ३’ चित्रपटात सलमान, कतरिनाबरोबरच इमरान हाश्मीचीही मुख्य भूमिका आहे. इमरानने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान आणि कतरिनाबरोबर इमरानचेही अॅक्शन सीन्स बघायला मिळाणार आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ हिंदीबरोबरच तामीळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.