रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.

फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे. रणबीर, रश्मिका अन् बॉबीसह या चित्रपटातील तृप्ती डीमरीचीही चांगलीच चर्चा आहे. चित्रपट आणि त्याच्या कथेवर बऱ्याच लोकांनी टीका केली असली तरी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावरही टीका होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “मला पॉर्न बघायला आवडतं पण…” भविष्यात ‘अ‍ॅनिमल’सारखे चित्रपट करण्याविषयी अर्शद वारसीचं मोठं विधान

इंडस्ट्रीतील काही मोठ्या समीक्षकांनी संदीपवर प्रचंड टीका जाणून बुजून केल्याचं दिग्दर्शकानेच स्पष्ट केलं आहे. आता नुकतंच एका मुलाखतीदरम्यान संदीप रेड्डी वांगाने प्रथमच यावर भाष्य करत सगळ्या टिकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. समीक्षकांना चित्रपटाबद्दल काहीही ज्ञान नाही हे वक्तव्यही त्याने या मुलाखतीदरम्यान केलं आहे. इतकंच नव्हे तर रणबीर कपूर व तृप्ती डीमरीमधील बूट चाटण्याच्या सीनवरुन होणाऱ्या टिकेलाही चोख उत्तर दिलं आहे.

‘कनेक्ट एफएम कॅनडा’शी संवाद साधताना संदीप म्हणाला, “एक माणूस आपल्या बाल्कनीतून ओरडून माझा चित्रपट पाहू नका असं सांगत असेल तर मी त्याचं कौतुक करेन कारण त्याला त्यातून काहीच आर्थिक फायदा होत नाहीये, पण ही समीक्षक मंडळी यूट्यूबवर व्हिडीओ शेअर करतात आणि त्यांना यातून प्रचंड पैसाही मिळतो. त्यामुळे जर माझ्या चित्रपटाचं समीक्षण करून तुम्हाला नाव, ओळख, पैसा, लोकप्रियता मिळत असेल तर त्यांनी खुशाल ते काम करावं. ‘कबीर सिंग’च्या वेळेसही बऱ्याच समीक्षकांनी हेच केलं. यातून या लोकांच्या मनात असलेली एका फिल्ममेकरप्रती असलेली घृणा आणि तिरस्कार यातून स्पष्ट होतो.”

View this post on Instagram

A post shared by Sandeep Reddy Vanga (@sandeepreddy.vanga)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा चित्रपट म्हणजे म्हणजे साडे तीन तासांचा छळ आहे असंही बऱ्याच लोकांनी सांगितलं. त्याविषयी बोलताना संदीप म्हणाला “या चित्रपटाला तुम्ही साडे तीन तासांचा टॉर्चर असं कसं म्हणू शकता, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. याबरोबरच संदीप यांनी सुचारिता त्यागी आणि राजीव मसंद यांची नावं घेत त्यांच्यावर टीका केली. संदीप यांच्या मते ही अशिक्षित मंडळी आहेत. संदीप म्हणाले, “कुणीच चित्रपटाच्या क्राफ्टबद्दल, एडिटिंगबद्दल, संगीताबद्दल काहीच बोलत नाहीये, कारण खरंच ही मंडळी अशिक्षित आहेत, एखाद्या चित्रपटाचं समीक्षण नेमकं कसं करायचं याचं यांना काहीही ज्ञान नाही.”