बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून नव्या ऑफिसच्या शोधात होती. साराला गेल्या आठवड्यात पापाराझींनी आई अमृता सिंहबरोबर वांद्रे येथील एका ऑफिसच्या जागेला भेट देताना पाहिले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता साराने अंधेरीमध्ये नव्या ऑफिससाठी जागा घेतल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’च्या टीमसह केदार शिंदेंची लेक सनाने काढला ‘भारी’ सेल्फी, पोस्ट शेअर करत म्हणाली…

मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार सारा अली खानने लोटस सिग्नेचरमध्ये कार्यालयासाठी नवीन जागा विकत घेतली आहे. याबाबत ‘विरल भय्यानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवर सुद्धा माहिती देण्यात आली आहे. लोटस सिग्नेचर ही जागा निर्माता आनंद पंडित यांची मालकीची आहे. ‘९९ एकर्स डॉटकॉम’ या रिअर इस्टेट वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार साराने विकत घेतलेल्या नव्या ऑफिसची किंमत १.०१ कोटी ते १.४६ च्या दरम्यान असू शकते.

हेही वाचा : इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीसाठी जुई गडकरीने घेतला पुढाकार, पोस्ट शेअर करत म्हणाली…

‘लोटस सिग्नेचर’चे बांधकाम सध्या सुरु असून डिसेंबर २०२५ मध्ये या ऑफिसचा ताबा अभिनेत्रीला मिळू शकतो. साराच्या अलीकडेच रिलीज झालेल्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्रीने भविष्यातील प्रोजेक्ट्सवर काम करण्यासाठी ऑफिस घेण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत अभिनेत्रीला ट्रोल केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, “ही जगाला सांगते, मी मिडल क्लास सामान्य मुलगी आहे.”, तर दुसऱ्या एका युजरने “इंटरनेट डेटा पॅकचे पैसे वाचून बघा तुम्ही काय काय घेऊ शकता…”

हेही वाचा : सिंधुताईंच्या भूमिकेला आवाज देणार ‘ही’ मराठी अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझं भाग्य…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटात सारा अली खानने अभिनेता विकी कौशलबरोबर मुख्य भूमिका साकारली होती. लवकरच सारा अनुराग बासूच्या मेट्रो इन दिनो चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. यामध्ये सारासह आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अनुपम खेर, अली फजल आणि नीना गुप्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.