ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या पत्नी शशी व १० वर्षांची मुलगी वंशिका यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या निधनानंतर एक फोटो पोस्ट करणाऱ्या वंशिकाने तिचं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केलं होतं. आता तिने पुन्हा तिचं अकाउंट सुरू केलं आहे.

दिवंगत दिशा सालियानचा बॉयफ्रेंड अडकणार लग्नबंधनात, काश्मीरमध्ये ‘या’ तारखेला होणार विवाह

‘ईटाइम्स’च्या रिपोर्टनुसार, सतीश कौशिकचे मॅनेजर संतोष राय यांनी वंशिकाने तिचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक डिलीट करण्याचे कारण सांगितले आहे. संतोष राय म्हणाले, “तुम्ही १३ वर्षांचे होईपर्यंत तुमच्या अकाउंटवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला एका गार्डियनची गरज असते. सतीश यांच्या निधनानंतर वंशिकाने ते अकाउंट डिलीट केले. कारण, त्या अकाउंटचा पासवर्ड आणि इतर तपशील सतीश कौशिक यांच्याकडे होते.” दरम्यान, आता वंशिकाने नवीन अकाउंट चालू केले आहे. वंशिकाने नवीन इन्स्टाग्राम अकाउंट उघडले आहे. त्या अकाउंटच्या गार्डियन वंशिकाची आई शशी कौशिक आहेत, अशी माहितीही संतोष राय यांनी दिली.

भांडण नाही, मतभेद नाही, तरीही गेली ३४ वर्षे पतीपासून वेगळ्या का राहतात अल्का याज्ञिक? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतीश कौशिक यांचं होळीच्या दुसऱ्या दिवशी ९ मार्च रोजी गुरुग्राममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर हत्येचा दावाही एका बिझनेसमॅनच्या पत्नीने केला होता, पण शशी कौशिक यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.