हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील लोक पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. दिल्लीमध्ये प्रवासादरम्यान सतीश यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं स्पष्ट झालं, आता त्यांचा मृतदेह मुंबईत आणणार असल्याची चर्चा होत आहे. सतीश यांच्यावर अंत्यसंस्कार मुंबईतच होणार असल्याची माहिती त्यांच्या घरच्यांनी दिली आहे.

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा

आणखी वाचा : ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात काम करण्यास इच्छुक होता आमिर खान; सतीश कौशिक यांनी अभिनेत्याला दिलेला नकार

सतीश कौशिक यांच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात एक पत्रक जाहीर करून माहिती दिली आहे. या पत्रकात म्हंटल्याप्रमाणे आज संध्याकाळी ५ वाजता सतीश यांच्या पार्थिवार अंत्यविधी पार पडणार आहेत. वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांच्या दर्शनासाठी त्यांना आणणार आहेत. तर संध्याकाळी ५ वाजता वर्सोवा येथीलच हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

satish kaushik family gives update
फोटो : इंडियन एक्सप्रेस

सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘तेरे नाम’ आणि कागजसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तर ‘मिस्टर इंडिया’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘मिस्टर और मिसेज खिलाड़ी’, ‘दिवाना मस्ताना’, ‘बड़े मियां छोटे मियां’,सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आजही त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत आणि सदैव राहतील.