Satish Kaushik Passed Away: बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं होतं? याबाबत त्यांच्या मॅनेजरने खुलासा केला आहे. मॅनेजर संतोष राय यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सतीश कौशिक यांच्या शेवटच्या क्षणातं काय घडलं, ते सांगितलं. ते म्हणाले, “सतीश सर रात्री सुमारे ९:४०च्या आसपास झोपण्यासाठी गेले. रात्री १० वाजता त्यांचा मला फोन आला. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचं, त्यांनी सांगितलं. मी लगेचच त्यांच्या रुममध्ये गेलो. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मी पूर्णवेळ त्यांच्याबरोबर होतो. पण ते आम्हाला सोडून जातील असं वाटलं नव्हतं”.

Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

हेही वाचा>> Satish Kaushik Passed Away: सतीश कौशिक यांच्या निधनाचं कारण समोर, शवविच्छेदन अहवालातून मिळाली माहिती

हेही पाहा>>Satish Kaushik Passed Away: पत्नी आणि १० वर्षांच्या मुलीसाठी किती संपत्ती सोडून गेले सतीश कौशिक?

सतीश कौशिक यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालातही हृदयविकाराचा झटक्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचं नमूद केलं आहे. कौशिक यांच्या मृतदेहावर कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. सतीश कौशिक यांच्या मृतदेहावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा>>Video: ६६व्या वर्षीही नियमित व्यायाम करायचे सतीश कौशिक, निधनानंतर जीममधील व्हिडीओ व्हायरल

सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईतील वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी कौशिक यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वर्सोवा येथीलच हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. सतीश कौशिक यांच्यामागे त्यांची पत्नी व १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे.