ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांचे आज (९ मार्च) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाचे ट्वीट करत चाहत्यांना ही बातमी दिली. मात्र त्यांच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं? याबद्दलची संपूर्ण माहिती आता समोर आली आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक हे काल दिल्लीत गेले होते. दिल्लीत ते एका मित्राच्या घरी थांबले होते. तेव्हा रात्रीच्या वेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला फोन केला आणि मला अस्वस्थ वाटत असून रुग्णालयात दाखल कर, असे सांगितले. त्यानंतर ड्रायव्हरनेही प्रसंगावधान राखत त्यांना गाडीत बसवले. पण वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रात्री १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
आणखी वाचा : सतीश कौशिक यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? जाणून घ्या कारण

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात इन्सुलिन देण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल
dhule police corruption marathi news
दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

यानंतर सतीश कौशिक यांचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार, कौशिक यांच्या मृतदेहावर कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. हृदयविकाराचा झटका आल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांकडूनही याप्रकरणाची चौकशी सुरु आहे.

आणखी वाचा : “तुम्हा सर्वांना…” सतीश कौशिक यांची शेवटची पोस्ट चर्चेत

दरम्यान सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईतील वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी कौशिक यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वर्सोवा येथीलच हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. सतीश कौशिक यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे.