Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. तीन दिवसांचा प्री-वेडिंगचा हा कार्यक्रम मोठ्या धुमधड्यात होतं आहे. आज कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे. काल, दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये बॉलीवूडचे सेलिब्रिटी थिरकताना पाहायला मिळाले. तीन खानने ‘नाटू नाटू’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला. तसेच इतर बॉलीवूड सेलिब्रिटी देखील जबरदस्त डान्स करताना दिसले.

या संगीत सोहळ्यातील कार्यक्रमादरम्यान शाहरुख खानने अंबानी कुटुंबाची ओळख खूप सुंदररित्या करून दिली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. शाहरुख खानचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘मानव मंगलानी’ या इन्स्टाग्रामवर पेजवर शेअर आला आहे.

हेही वाचा – Video: अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये ९०च्या दशकातील लोकप्रिय गाण्यावर थिरकल्या बॉलीवूडच्या तारका, मनीष मल्होत्राने दिली साथ

या व्हिडीओत, शाहरुख ‘जय श्रीराम’ म्हणत अंबानी कुटुंबातील त्रिमुर्तीची ओळख करून देताना दिसत आहे. किंग खान म्हणतो, “तुम्ही सर्वांनी आता डान्स परफॉर्मन्स पाहिले. आपल्या बंधू आणि भगिनींनी डान्स केला. पण युनिटीबद्दल बोलायचं झालं तर प्रार्थना आणि आशीर्वादांशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. तर मी तुम्हाला अंबानी कुटुंबातील शक्तिशाली महिलांची ओळख करून देतो, ज्या या कुटुंबाच्या तीन देवी, त्रिमुर्ती आहेत. सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती. या तिघींनी या कुटुंबाला एकत्र जोडून ठेवले आहे त्या म्हणजे कोकिलाबेन अंबानी, पूर्णिमा दलाल आणि देव्यानी खिमजी. या अंबानी कुटुंबाच्या खांब आहेत.” अशी ओळख शाहरुखने करून दिली.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची बायको आहे डॉक्टर, ठाण्यात सुरू केलं स्वतःचं पहिलं क्लिनिक

दरम्यान, अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचा आज शेवटचा दिवस आहे. आज ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ हा कार्यक्रम आहे. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम असून यात पाहुण्यांना जामनगर फिरवलं जाणार आहे. तर दुसरा कार्यक्रम भारतीय पेहरावात असणार आहे.