बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता लवकरच ‘जवान’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो अलीकडेच अभिनेत्याने ‘आस्क एसआरके’ (#AskSRK)सेशन घेतले. या वेळी शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना शाहरुखने भन्नाट उत्तरे दिली आहेत.

हेही वाचा : “सीता मातेबरोबर स्वत:ची तुलना करू नकोस” क्रिती सेनॉनने शेअर केलेला ‘तो’ फोटो पाहून नेटकरी संतापले

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला त्याच्या चाहत्याने‘आस्क एसआरके’सेक्शनमध्ये “तू सिगारेट सोडलीस का?” असा प्रश्न विचारला होता. या चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत शाहरुख म्हणाला, “होय, मी खोटं बोललो…मी स्वत:ला कॅन्सरच्या धुराने वेढून घेतले आहे. ” शाहरुखने दिलेले उत्तर पाहून अनेकांनी त्याला “जरा काळजी घेत जा” असा सल्ला दिला आहे.

हेही वाचा : आलिया-रणवीरच्या ‘रॉकी और रानी…’चा टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज; ‘आदिपुरुष’ची लोकप्रियता पाहून करण जोहरचा मोठा निर्णय

२०११ मध्ये एका मुलाखतीमध्ये शाहरुखने सिगारेट ओढण्याच्या सवयीबाबत खुलासा केला होता. तो म्हणाला होता, “मला झोप येत नाही मी दिवसाला १०० सिगारेट ओढतो. या नादात अनेकदा जेवणही विसरुन जातो आणि पाणीही पित नाही. सिगारेट व्यतिरिक्त मी जवळपास ३० कप ब्लॅक कॉफीचे सेवने करतो. तरीही माझ्याकडे सिक्स पॅक ऍब्स आहेत. त्यामुळे मी स्वत:ची फार काळजी घेत नाही…परंतु काही कारणास्तव किंवा चित्रपटांच्या निमित्ताने माझी काळजी आपोआप कोणाकडून तरी घेतली जाते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.”

हेही वाचा : पतीवर सेक्स स्कॅण्डलचा आरोप अन्…; ‘द ट्रायल…’ वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित, काजोलचे ओटीटीवर दमदार पदार्पण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा शाहरुखबरोबर प्रमुख भूमिका साकारणार आहे. जवान ७ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे. ‘पठाण’नंतर या शाहरुखचे चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.