Shah Rukh Khan सुपरस्टार शाहरुख खान ( Shah Rukh Khan ) हा त्याच्या सिनेमांमुळे कायमच चर्चेत असतो. नुकताच त्याचा वाढदिवस साजरा झाला. शाहरुख खान त्याच्या एका कृतीमुळे चांगला चर्चेत आला आहे. कारण मन्नत या शाहरुखच्या निवासस्थानाबाहेर त्याचा एक चाहता त्याची ९५ दिवस वाट बघत होता. या चाहत्याला शाहरुख खान ( Shah Rukh Khan ) भेटला आहे. २ नोव्हेंबरला शाहरुख खानचा ( Shah Rukh Khan ) वाढदिवस साजरा झाला. यानंतर शाहरुख खानने ९५ दिवस त्याची वाट पाहणाऱ्या चाहत्याची भेट घेतली आहे.

इन्स्टाग्राम पोस्टवर काय म्हटलं गेलं आहे?

@SRKUniverse या पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यावर कॅप्शन लिहिण्यात आली आहे की किंग खानने आज त्याच्या चाहत्याची भेट घेतली. त्याचा हा चाहता झारखंडहून आला होता. तो मन्नतच्या बाहेर ९५ दिवस थांबला होता. अगर किसी चीज को दिलसे चाहो तर शाहरुख स्वप्न पूर्ण करतोच. या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे.

काय दिसतं आहे या फोटोत?

या फोटोत शाहरुख खान ( Shah Rukh Khan ) ग्रे रंगाच्या टी शर्टमध्ये आहे. त्याने ब्रेसलेट आणि गॉगल लावला आहे. या फोटोत शाहरुख त्याच्या चाहत्याला भेटताना दिसतो आहे. मन्नत या शाहरुख खानच्या बंगल्या बाहेर त्याच्या वाढदिवसा निमित्त अनेक चाहते भेटण्यासाठी येत असतात. शाहरुखने नुकताच त्याचा ५९ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी ९५ दिवस मन्नतच्या बाहेर वाट बघत होता. त्याला शाहरुख भेटला आहे. त्यामुळे या चाहत्याचं शाहरुखला भेटण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. यावेळी शाहरुख खानने गॅलरीतून येऊन चाहत्यांना अभिवादन केलं नाही. उलट तो मन्नतच्या बाहेर आला आणि त्याने काही चाहत्यांची भेट घेतली. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- Shahrukh Khan Birthday : रोमान्स किंग असलेल्या शाहरुखचे ‘हे’ ॲक्शन चित्रपटही ठरले ब्लॉकबस्टर, तुम्ही पाहिलेत का?

शाहरुखने सोडली सिगारेट पिण्याची सवय

शाहरुखच्या अनेक गोष्टी चाहत्यांसाठी प्रेरणादायी आहेत. पण, त्याची एक सवय जी आयुष्यात कोणीही आत्मसात करू नये अशी स्वत: किंग खानची सुद्धा इच्छा होती. त्याच्या कुटुंबीयांपासून त्याचे चाहते सुद्धा शाहरुखने सिगारेट पिणं सोडून द्यावं यासाठी आग्रही होते आणि अखेर याबद्दलचा मोठा खुलासा अभिनेत्याने त्याच्या ५९ व्या वाढदिवशी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल

शाहरुख खानने ( Shah Rukh Khan ) त्याच्या वाढदिवशी ‘मीट अँड ग्रीट’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या मुलाखतीत अभिनेत्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यादरम्यान शाहरुखने त्याने सिगारेट ओढायची सवय कायमस्वरुपी सोडल्याचं सांगितलं. अभिनेत्याचा खुलासा ऐकून त्याचे चाहते जल्लोष करू लागले. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.