अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहे. दीपिकाचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने शाहरुखने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पठाणमधील दीपिकाचं एक पोस्टरही शेअर केलं आहे.

दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडमधील कलाकारांसह चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. अशातच किंग खानने त्याची सह-कलाकार दीपिकाला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. “दीपिका पदुकोण प्रत्येक संभाव्य भूमिकेत तू स्क्रीनवर जादू करण्यासाठी स्वतःला विकसित केलं आहेस. मला तुझा सदैव खूप अभिमान वाटतो. तुला आयुष्यात नवीन उंची गाठण्यासाठी सदैव शुभेच्छा… वाढदिवसाच्या शुभेच्छा… खूप प्रेम…” असं कॅप्शन देत शाहरुखने दीपिकाचे एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये दीपिका हातात बंदूक घेतलेली दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पठाण’ या अॅक्शनपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम शाहरुख खानबरोबर महत्त्वाचा भूमिकेत दिसणार आहे. या तिकडीचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांना २५ जानेवारीला त्यांच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहता येणार आहे.