अभिनेता शाहिद कपूर बॉलीवूड इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आपल्या करिअरची सुरुवात नृत्यापासून करणाऱ्या या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. करिअरच्या या खडतर प्रवासात शाहिदला धूम्रपान करण्याची सवय लागली होती. परंतु, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, धूम्रपान करणे त्याने कायमचे सोडले आहे आणि त्याचं कारणही तितकंच खास आहे.

अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोमध्ये शाहिदने हजेरी लावली होती. या मुलाखतीत शाहिदने सिगारेट सोडण्यामगचं कारण सांगितलं. तो म्हणाला, “माझ्या मुलीपासून लपून मी धूम्रपान करायचो आणि याच कारणामुळे धूम्रपान सोडण्याचा मी निर्णय घेतला. एके दिवशी जेव्हा मी माझ्या मुलीपासून लपून धूम्रपान करत होतो तेव्हा मी स्वतःला सांगितलं की, हे असं लपून मी कायमच धूम्रपान करू शकणार नाही आणि त्याच दिवशी मी धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला.”

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

शाहिद आणि त्याच्या मुलीचं बॉंडिंग खूप चांगलं आहे. अनेकदा तो त्याच्या कुटुंबासह माध्यमांसमोर आला आहे. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत जुलै २०१५ मध्ये विवाहबंधनात अडकले. शाहिद आणि मीराला दोन मुले आहेत, मिशा आणि जैन. मीशा कपूर ही सात वर्षांची आहे, तर जैन हा चार वर्षांचा आहे.

हेही वाचा… फक्त ९९ रुपयांमध्ये पाहता येणार तुमच्या आवडीचा चित्रपट; ‘सिनेमा लव्हर्स डे’च्या निमित्ताने आहे खास ऑफर

दरम्यान, शाहिदच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०२४ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सॅनोनची मुख्य भूमिका आहे. बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केल्यानंतर, ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ने ५० कोटींचा आकडा पार केला आहे. ‘देवा’ या अगामी चित्रपटात शाहिद कपूर पूजा हेगडेसह झळकणार आहे. हा चित्रपट ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.