बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. याच निमित्ताने शाहरुख खानने सोशल मीडियावर Ask me anything हे सेशन घेतलं. त्यावर त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली.

शाहरुख खान रविवारी ख्रिसमसच्या निमित्ताने ट्विटरवर Ask me anything हे सेशन आयोजित केले होते. या लाइव्ह सेशनमध्ये त्यानं चाहत्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यावेळी शाहरुखला पठाण चित्रपटासह त्याच्या खासगी आयुष्याबदद्ल अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची शाहरुखने फार हटके पद्धतीने उत्तरं दिली.
आणखी वाचा : “माफ करा…” सलमान खानबद्दलचा प्रश्न विचारताच शाहरुख खानने दिली प्रतिक्रिया

“सर्वांना नाताळच्या शुभेच्छा. आजचा पूर्ण दिवस हा ख्रिसमसचे सेलिब्रेशन करण्यात गेला. आता मला थोडासा वेळ मिळाला आहे. त्या निमित्ताने मी AskSRK सेशन घेऊ असा विचार केला”, असे शाहरुखने म्हटले. त्याच्या या ट्वीटनंतर अनेक चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले.

यावेळी त्याला एका चाहत्याने तुम्ही इतके सुंदर कसे काय दिसता? असा प्रश्न विचारला होता. त्यावर शाहरुखने त्याला हटके स्टाईलने उत्तर दिले. “माझ्या वडिलांचे जनुके (Genetics) चांगले होते”, असे शाहरुख खानने म्हटले.

आणखी वाचा : सलमान, शाहरुख आणि आमिर खानपैकी सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या त्यांच्या संपत्तीविषयी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ हा चित्रपट देखील आहे.