बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा ‘पठाण’पासून पुन्हा चर्चेत आला आहे. रोमान्स किंग हे बिरुद मिरवणारा शाहरुख खऱ्या आयुष्यातसुद्धा तितकाच रोमॅंटिक आहे हे त्याच्या आणि गौरी खानच्या लव्हस्टोरीकडे बघून आपल्याला जाणवतं. बॉलिवूडमध्ये या दोघांकडे एक आदर्श जोडपं म्हणून बघितलं जातं. शाहरुखकडे फेम, ग्लॅमर काही नसताना गौरीने त्याची साथ दिली आणि तब्बल ३० वर्षं तिने ती साथ निभावली. शाहरुखनेही तिला कसलीच कमतरता भासू दिली नाही.

गौरीचे आई वडील आणि घरची इतर वडीलधारी मंडळी प्रथम या लग्नाच्या विरोधात होते. पण नंतर मात्र त्यांनी या लग्नाला होकार दिला, लग्नासाठी शाहरुख खानने चक्क स्वतःचं नावदेखील बदललं होतं. लेखक, अभिनेता आणि शाहरुखचा जवळचा मित्र मुस्ताक शेख याने त्याच्या एका पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.

आणखी वाचा : “हा ज्यू लोकांचा अपमान…” एका सीनमुळे वरुण व जान्हवीचा ‘बवाल’ ओटीटीवरुन हटवण्याची होतीये मागणी

गौरीबरोबर आर्य समाजाच्या पद्धतीने लग्नगाठ बांधण्यासाठी शाहरुखने त्याचं नाव ‘जितेंद्र कुमार टुल्ली’ असं ठेवलं होतं. शाहरुखने हेच नाव का निवडलं याबाबतीतच या पुस्तकात नमूद केलं आहे. या नावाच्या माध्यमातून शाहरुखने दोन जुन्या सुपरस्टार्सना मानवंदना दिली आहे. शाहरुखच्या आजीला तो जितेंद्रसारखा वाटत असल्याने त्याने पहिले हे नाव निवडले, आणि टुल्ली जे अभिनेते राजेंद्र कुमार यांचे खरे आडनाव होते. यामुळेच त्याने ही दोन नावं जोडून लग्नासाठी ‘जितेंद्र कुमार टुल्ली’ हे नाव लावायचं ठरलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी हिंदू रितीरिवाजानुसार आणि मग मुस्लिम परंपरेनुसार शाहरुख आणि गौरीचं लग्न पार पडलं, इतकंच नव्हे तर त्यांनी कोर्टात जाऊनही लग्न केलं. शाहरुखने लग्नासाठी नाव बदलल्याचं पाहून मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न करताना गौरीनेही ‘आयेशा’ हे नाव लावलं होतं. या दोघांचं लग्न झालं तेव्हा शाहरुख केवळ २६ वर्षांचा होता अन् गौरी ही फक्त २१ वर्षांची होती. शाहरुख आणि गौरी यांची तीनही मुलं हे दोन्ही धर्मांचं पालन करतात.