बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘पठाण’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाची दोन गाणी रिलीज झाली आहेत. यामध्ये शाहरुख आणि दीपिकाची ऑनस्क्रीन दमदार केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. चित्रपटाच्या आधी ट्रेलर रिलीज होण्याची ते वाट पाहत आहेत. पण चित्रपट कधी रिलीज होणार, याविषयी चित्रपट निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु दरम्यान, पठाणच्या ट्रेलरची चर्चा ट्विटरवर रंगली आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्यास काही दिवस शिल्लक आहेत पण निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केलेला नाही. प्रेक्षक आतुरतेने ट्रेलर रिलीज होण्याची वाटत पाहत आहेत. अशातच ‘पठाण’चा ट्रेलर असल्याचा दावा करणारा व्हिडीओ ट्विटरवर फिरत आहे.

आणखी वाचा – ‘पठाण’ आणि दीपिकाच्या भगव्या बिकिनी वादावर सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आमच्यापुढे…”

शाहरुख खानच्या एका चाहत्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबत “#pathaan ट्रेलर लीक!!” इथून ट्रेलर लीक झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, ही व्हिडीओ क्लिप ‘पठाण’ चित्रपटातील असल्याचा दुजोरा कुणीही दिलेला नाही. हा व्हायरल व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिलाय. तसेच त्यांनी त्या युजरवर टीकाही केली आहे. हा ट्रेलर नसून जाहीरात असल्याचं काहींनी म्हटलंय.

हेही वाचा – “पठाणचा ट्रेलर पाहून मी…” ४ वर्षांनी ॲक्शनपटातून कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट सध्या बेशरम गाण्यामुळे चर्चेत आहे. चित्रपट सध्या या गाण्यातील भगव्या बिकिनीमुळे वादात अडकला आहे. या गाण्यातील काही दृश्यांमध्ये बदल करण्यासही सेन्सॉर बोर्डाने सुचवलं आहे. चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे, पण ट्रेलर अद्याप रिलीज झालेला नाही, त्यामुळे निर्मात्यांकडून त्याबद्दल घोषणा कधी होईल, याची वाट चाहते पाहत आहेत.