scorecardresearch

Premium

‘जवान’च्या ‘त्या’ डायलॉगवर होणाऱ्या राजकारणाबद्दल शाहरुखने केलं वक्तव्य; म्हणाला “देशाच्या भल्यासाठी…”

या मोनोलॉगमध्ये शाहरुखचं पात्र सामान्य जनतेला मतदानाच्या अधिकाराबद्दल आणि त्याकडे कितपत गांभीर्याने आपण लक्ष द्यायला हवं याविषयी भाष्य करतं

shahrukhkhan-controversy-jawan
फोटो : सोशल मीडिया

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. अखेर ७ सप्टेंबर रोजी हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७० कोटींची छप्परफाड कमाई केली. संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरातही या चित्रपटाची चांगलीच हवा आहे. जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

सोशल मीडियावर या चित्रपटातील बरेच सीन्स, डायलॉग तसेच फोटोज व्हायरल होत आहेत. याबरोबरच चित्रपटातील शाहरुख खानचा क्लायमॅक्सच्या मोनोलॉगचीही चांगलीच चर्चा होत आहे. या मोनोलॉगमध्ये शाहरुखचं पात्र सामान्य जनतेला मतदानाच्या अधिकाराबद्दल आणि त्याकडे कितपत गांभीर्याने आपण लक्ष द्यायला हवं याविषयी भाष्य करतं.

OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?
Jayant Patil on vilasrao deshmukh
“राजकारणासाठी व्यक्तिगत नाते तोडू नये”, काँग्रेसमधील ‘काका-पुतण्या’च्या नात्यावर जयंत पाटलांचं विधान!
Loksatta anvyarth Live in relationship Written permission of the Registering Officer is mandatory Government of Uttarakhand
अन्वयार्थ: ..आता ‘काजी’सुद्धा असायला पाहिजे राजी?
man killed his mother for opposing immoral relationship
वर्धा : अनैतिक संबंधास विरोध; मुलाने आईच्या डोक्यात घातला वरवंटा

आणखी वाचा : शाहरुखच्या मुलाच्या वेब सीरिजबद्दल मोठी अपडेट; आर्यन खानच्या प्रोजेक्टमध्ये बॉबी देओल साकारणार मुख्य भूमिका

शाहरुखच्या या डायलॉगवरुन सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. कॉँग्रेसच्या माजी खासदारांनीदेखील मोदी सरकारला ‘जवान’ हा चित्रपट ‘गदर २’ प्रमाणे संसदेत दाखवण्याचे आव्हान दिले आहे. एकूणच शाहरुख खानच्या ‘जवान’ला राजकीय वळण मिळत असतानाच शाहरुखने यावर भाष्य केलं आहे. एका चाहत्याच्या ट्वीटला उत्तर देताना शाहरुखने याविषयी चर्चा केली आहे.

शाहरुखच्या एका चाहत्याने ‘जवान’ पाहतानाचे काही फोटोज ट्वीट केले अन् त्यात शाहरुखला टॅग करून लिहिलं की, “माफ करा मी स्पॉइलर देत असेन तर, पण चित्रपटातील शेवटचे भाषण हे फारच अप्रतिम होते.” चाहत्याच्या या ट्वीटला उत्तर देत शाहरुखने लिहिलं, “अरे त्याच्यात काहीच स्पॉइलर नाहीयेत. देशाच्या भल्यासाठी सगळे स्पॉइलर माफ. प्रत्येकाने त्यांचा मतदानाचा अधिकार हुशारीने आणि सतर्क राहून बजावला पाहिजे. आणि हो हे सोडून चित्रपटाबद्दल आणखी स्पॉइलर मी देणार नाहीये, आणि तुम्ही पण नका देऊ.”

shahrukh-tweeet
फोटो : सोशल मीडिया

या मोनोलॉगचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज लोकांनी शेअर केले आहेत. सुरुवातीला हे सगळे व्हिडीओज ‘रेड चिलीज’कडून हटवण्यात आले होते, पण आता शाहरुख खानच्या या उत्तरामुळे काही व्हिडीओज आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. ‘जवान’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. यात शाहरुखसह नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदूकोण, सुनील ग्रोव्हर यांच्यामहत्त्वाच्या भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahrukh khan speaks about controversial monologue getting viral from jawan avn

First published on: 12-09-2023 at 18:24 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×