‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेता राकेश बापट व शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी काही वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचे ब्रेकअप झाले. आता शमिताने रिअॅलिटी शोमध्ये प्रेमात पडण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच तिला कसा जोडीदार हवा, त्याबद्दलही मत व्यक्त केलं.
बिग बॉसच्या घरात असताना शमिता राकेश बापटच्या प्रेमात पडली होती. पिंकव्हिलाशी बोलताना शमिता म्हणाली, “प्लीज हे सगळं नीट समजून घ्या. जेव्हा तुम्ही इतके दिवस एकाच घरात असता, तेव्हा असं नातं निर्माण होणं स्वाभाविक आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही तिथे आधार शोधत असता, जवळीक शोधता आणि ते सगळं खूप नैसर्गिक आहे. पण जर आम्ही बाहेर भेटलो असतो तर कदाचित आम्ही एकत्र आलो नसतो, कारण आम्ही एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. तो माझ्या आयुष्यातील पुसला गेलेला अध्याय आहे.”
तडजोड करायची नसते- शमिता
शमिता स्वातंत्र्याबद्दलच्या तिच्या दृष्टिकोनाबद्दल म्हणाली, “कालांतराने तुम्हाला तुमच्या काही विशिष्ट पद्धतींची सवय होते. तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय नाही हे तुम्हाला कळतं. काही गोष्टींमध्ये तुम्हाला तडजोड करायची नसते. एक स्वतंत्र आणि काम करणारी महिला म्हणून, मला एकटं राहायला आवडतं. मला शांततेशी तडजोड करायची नसते. मला वाटते की बरेच लोक एकटे असतानाच नात्यात येतात, पण मी स्वतःच्या जगात खूश असल्याने नात्यात येण्यासाठी मला थोडा वेळ लागतो.”
नाती भावनिकदृष्ट्या थकवणारी असू शकतात, असं शमिताने नमूद केलं. “जोपर्यंत मला माझा आदर करणारा कोणीतरी सापडत नाही, तोपर्यंत मी नात्यात पुढे जाणार नाही,” असं शमिता म्हणाली.
शमिता व राकेश बापट यांची पहिली भेट २०२१ मध्ये ‘बिग बॉस ओटीटी’ दरम्यान झाली होती. या शोमध्येच त्यांच्यात प्रेम फुललं. शोनंतरही त्यांनी डेटिंग सुरू ठेवले पण २०२२ मध्ये ते वेगळे झाले.
जानेवारी २०२२ मध्ये शमिताने त्यांच्या ब्रेकअपची पुष्टी केली होती. “मला वाटतं की हे स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे. राकेश आणि मी आता एकत्र नाही. बराच काळ झाला. पण हा सुंदर म्युझिक व्हिडीओ त्या सर्व चाहत्यांसाठी आहे ज्यांनी आम्हाला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. वैयक्तिकरित्या देखील तुमच्या प्रेमाचा आमच्यावर वर्षाव करत राहा,” असं शमिता म्हणाली होती.
शमिता शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची सुश्रुत जैन दिग्दर्शित ‘द टेनंट’मध्ये (२०२३) दिसली होती. ती नुकतीच तिची बहीण शिल्पा शेट्टीबरोबर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये झळकली होती. तर राकेश बापटचं पहिलं लग्न अभिनेत्री रिद्धी डोगराशी झालं होतं, पण त्यांचा घटस्फोट झाला.