सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपट प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. चित्रपटाची कथा चार महिलांची आहे ज्यांना मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.

एकीकडे काही लोक या चित्रपटाला प्रचंड विरोध करत आहेत, तर दुसरीकडे या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटासाठी गर्दी केल्याचं ठीकठिकाणी बघायला मिळत आहे. अभिनेत्री कंगना रणौतनेही यावर भाष्य केलं आहे. अशातच आता मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीदेखील या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांनी एक मोठा व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचं कौतूक केलं आहे.

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

आणखी वाचा : पाळीव श्वानाशी इंग्रजीत बोलणाऱ्या प्रसाद ओकचा व्हिडीओ चर्चेत; धमाल कॉमेंट करत नेटकरी म्हणाले, “किती पेग…”

शरद पोंक्षे यांनी या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टींवर सविस्तर भाष्य केलं आहे, त्यासाठी तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता. नेमकं शरद पोंक्षे काय म्हणाले ते जाणून घेऊया. ते म्हणाले,
“काल रात्री मी केरला स्टोरी पाहिला. चित्रपट पाहून मला रात्रभर झोप लागली नाही. चित्रपटातील काही सीन्स सतत डोळ्यासमोर येत होते. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की प्रत्येकाने हा चित्रपट पाहायलाच हवा. निर्माते आणि दिग्दर्शक यांनी खूप मोठं धैर्य दाखवलं आहे. चित्रपट पाहून बरेच प्रश्न मनात उद्भवतात. ब्रेनवॉश करण्यात हे जिहादी यशस्वी होतात कारण आपण आपल्या संस्कृतीबद्दल अनभिज्ञ आहोत. आपल्या याच अज्ञानाचा फायदा हे जिहादी घेतात. हेच सगळं या चित्रपटात दाखवलं आहे. यासाठीच हिंदुस्तानातील प्रत्येकाने, मुलांनी मुलींनी हा चित्रपट पाहायला हवा, बरीच लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत. मी हात जोडून सगळ्या पालकांना, स्त्रियांना विनंती करतो की एकदातरी केरला स्टोरी जाऊन बघा. जिहादच्या नावावर जे काही चालू आहे यापासून सावध व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. जोवर या देशात हिंदू बहुसंख्य आहेत तोवर या देशात सेक्युलरिजम टिकून राहील. ज्यादिवशी हिंदू अल्पसंख्यांक होईल तेव्हा या देशाचं इस्लामीकरण करण्यात येईल याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही.”

आणखी वाचा : मध्य प्रदेश सरकारने ‘The Kerala Story’ केला टॅक्स फ्री; राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले चित्रपट पाहायचे आवाहन

पुढे शरद पोंक्षे म्हणतात, “आपल्या हिंदूच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केल्याबद्दल विपुल शहा आणि दिग्दर्शक यांना सॅल्यूट. चित्रपट संपल्यानंतर लगेच बाहेर जाऊ नका, याचे सगळे पुरावे त्यात देण्यात आले आहेत. मी पुन्हा हात जोडून विनंती करतो देशातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहायला हवा. तुम्ही जागे व्हा, ह्या सुंदर हिंदू धर्माला वाचवा. वसुधैव कुटुंबकमची भावना ही फक्त आपल्या रक्तात आहे. लवकरात लवकर जाऊन हा चित्रपटगृहात जाऊन हा केरला स्टोरी पाहा. ओटीटीवर यायची वाट पाहू नका, हा चित्रपट पाहणं आणि याला पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे.”

४० कोटींचं बजेट असलेल्या ‘द केरला स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर एकाच दिवसात ७.५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रचंड विरोध होत होता. शिवाय याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका याचिकेवर सुनावणी करताना ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला. या वेळी केरळमधील ३२ हजारांहून अधिक महिलांना ISIS मध्ये भरती करण्यात आल्याचा दावा करणारा चित्रपटाचा टीझर त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून काढून टाकला जाईल, असे आश्वासन निर्मात्याने उच्च न्यायालयाला दिले.