बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा ही कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच शर्लिन चोप्राने राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान हा तिचा भाऊ नाही, असा खुलासा केला होता. त्यानंतर आता त्या दोघांचा एक नाव व्हिडीओ समोर आला आहे.

नुकतंच वॉमप्ला या एका इन्स्टाग्राम पेजने शर्लिन चोप्रा आणि आदिल खानचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत शर्लिन चोप्रा आणि आदिल खान एका जुहूमधील एका अलिशान हॉटेलमध्ये पोहोचल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : “ती जखम रोज थोडी थोडी…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

यावेळी ते हातात हात घालून एकत्र हॉटेलमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. यानंतर ते हॉटेलमध्ये बसून एकत्र खाताना दिसत आहेत. यावेळी अचानक शर्लिनचा एक कानातला हरवतो आणि ते दोघेही तो शोधताना दिसतात. यानंतर शर्लिनला तो कानातला भेटल्यानंतर आदिल तिच्या कानातही तो घालतो. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Sherlyn Chopra video comment (1)
शर्लिन चोप्रा-आदिल खानच्या व्हिडीओवरील कमेंट

यावर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. “हे पाहिल्यानंतर राखीची प्रतिक्रिया काय असेल”, अशी कमेंट एकाने या व्हिडीओवर केली आहे. तर एकाने “हे दोघे तर एकमेकांना भाऊ-बहीण मानायचे ना”, असे म्हटले आहे. तसेच एकाने “आधी भाऊ होता आणि आता बॉयफ्रेंड बनवण्याचा प्रयत्न करतेय” अशी कमेंट केली आहे. “भाऊ आता बॉयफ्रेंड बनलाय आणि हे दोघे राखीला दोष देतात” अशी कमेंट एकाने केली आहे. दरम्यान अद्याप यावर राखी सावंतची प्रतिक्रिया आलेली नाही.