रविवारी (१७ मार्च रोजी) अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लाडक्या लेकीचा म्हणजे श्वेता बच्चनचा वाढदिवस होता. श्वेताच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. अभिषेक बच्चननेही एक खास व्हिडीओ शेअर करत बहिणीला शुभेच्छा दिल्या होत्या. श्वेताच्या वाढदिवसाची जंगी पार्टीही करण्यात आली. पण या सर्वांनाच श्वेताच्या पतीचा वाढदिवसाचा मात्र विसर पडल्याचं दिसून आलं.

श्वेता बच्चनचे पती व अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा यांचा आज (१८ मार्च रोजी) ५० वा वाढदिवस होता. पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्वेता किंवा बच्चन कुटुंबातील कुणीही सोशल मीडियावर पोस्ट केल्याचं दिसून आलं नाही. ऐरवी छोट्या छोट्या क्षणांचेही फोटो स्टोरीला पोस्ट करणाऱ्या श्वेतानेही पतीच्या वाढदिवसाची मात्र पोस्ट टाकली नाही.

श्वेता बच्चन आई-वडिलांसह मुंबईत का राहते? पतीबरोबर न राहण्याचं कारण काय? जाणून घ्या

अमिताभ बच्चन व अभिषेकही कुटुंबातील प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट करत असतात, पण निखिल यांच्या वाढदिवसानिमित्त नव्या नवेली वगळता कोणीच सोशल मीडियावर पोस्ट केली नाही. फक्त नव्याने बाबांबरोबरचा तिचा बालपणीचा फोटो स्टोरीवर शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा डॅड, आय लव्ह यू,’ असं कॅप्शन नव्याने फोटोला दिलं होतं.

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
navya naveli post for father
नव्या नवेली नंदाची स्टोरी (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, निखिल नंदा हे बच्चन कुटुंबातील कार्यक्रमांमध्येही फारसे दिसत नाहीत. अगस्त्य नंदाचा चित्रपट ‘द आर्चीज’ च्या स्क्रीनिंगला निखिल नंदा बच्चन कुटुंबाबरोबर दिसले होते. ऐरवी मात्र कधीच ते बच्चन कुटुंबाबरोबर दिसत नाही. निखिल नंदा हे उद्योगपती असून कामानिमित्त दिल्लीत राहतात, तर श्वेता मुलगा अगस्त्यबरोबर मुंबईत राहते. नव्या वडिलांच्या व्यवसायात मदत करते, तसेच स्वतःचा व्यवसायही सांभाळते, त्यामुळे ती दिल्ली व मुंबई असा प्रवास करत असते.