Sidharth Malhotra Kiara Advani Announces Pregnancy: ‘कबीर सिंग’मधील प्रीती अर्थात कियारा अडवाणी आई होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी हे दोघेही आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

कियारा व सिद्धार्थ यांच्या लग्नाला ७ फेब्रुवारीला दोन वर्षे झाली. आता त्यांच्या आयुष्यात नवीन सदस्य येणार आहे. कियारा व सिद्धार्थ यांनी एक फोटो शेअर करून ही गुड न्यूज शेअर केली आहे. दोघांनी हातात बाळाच्या मोचे पकडलेला एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोबरोबर एक क्युट कॅप्शन देत त्यांनी ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

“आमच्या आयुष्यातील सर्वात मोठे गिफ्ट… लवकरच येत आहे,” असं कॅप्शन कियाराने या फोटोला दिलं आहे. कियाराने हा फोटो पोस्ट केल्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पाहा पोस्ट

कियारा व सिद्धार्थ यांनी ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कियारा व सिद्धार्थ यांच्यातील जवळीक वाढली आणि ते खऱ्या आयुष्यात प्रेमात पडले. त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले. काही वर्षे डेट केल्यावर दोघांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राजस्थानमध्ये जैसलमेर येथे सूर्यगढ पॅलेसमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. लग्नाचा दुसरा वाढदिवस सेलिब्रेट केल्यानंतर काही दिवसांनी आता त्यांनी आई-बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली आहे. सिद्धार्थ व कियारा दोघांचेही चाहते व सिनेविश्वातील सेलिब्रिटी अभिनंदन करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तर कियारा लवकरच रणवीर सिंहबरोबर ‘डॉन ३’ मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, सिद्धार्थ मल्होत्रा ​​सध्या ‘परम सुंदरी’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तो जान्हवी कपूरबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.