बॉलिवूडमधील लोकप्रिय सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील कलाकारांसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी कुटुंबीयही सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात उपस्थित होते. अंबानींनी सिद्धार्थ-कियाराला लग्नाचं खास गिफ्टही दिलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अंबानींनी सिद्धार्थ-कियाराला रिलायन्स ट्रेंड फुटवेअर कंपनीचं ब्रँड अँम्बासिडर बनवलं आहे.

हेही वाचा>> Video: ‘बिग बॉस’च्या फायनलआधीच शिव ठाकरेचं मोठं वक्तव्य; म्हणाला “एमसी स्टॅनने ट्रॉफी जिंकली तर…”

मीडिया रिपोर्टनुसार, रिलायन्स रिटेल लिमिटेड फॅशन व लाइफस्टाइल सीईओ अखिलेश प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली आहे. “कियारा व सिद्धार्थ बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय कपल आहेत. युवा आयकॉन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं फॅन फॉलोविंगही चांगलं आहे. त्यांना ब्रँड अ‍ॅम्बासिडर केल्यामुळे जास्तीत जास्त तरुणांपर्यंत आम्हाला पोहोचता येईल”, असं ते म्हणाले.

हेही वाचा>> ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील ओमला भेटली स्वीटू! शाल्व किंजवडेकर अडकणार लग्नाच्या बेडीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ-कियारा लग्नाआधी अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. ‘शेरशाह’ चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. लग्नानंतर आता त्यांचं मुंबईत रिसेप्शन असणार आहे.