महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज (१६ मे) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले. तसेच उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून राजीनामा दिल्यामुळे आम्ही त्यांचं सरकार पूनर्स्थापित करू शकत नाही, असं मतही नमूद केलं. यानंतर सोशल मीडियावर या निर्णयाबद्दल भरपूर प्रतिक्रिया येऊ लागल्या. विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील काही वेळापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदे-फडणवीस सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. “असंविधानिक, बेकायदा आणि अनैतिक. आजच्या निकालानंतर मिंधे भाजपा सरकारकडे बघण्याचा हा एकच मार्ग आहे” असं आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हंटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या पोस्टवर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया देत शिंदे सरकारवर टीका केली आहे.

आणखी वाचा : ‘The Kerala Story’मधील मुख्य अभिनेत्री अदा शर्माचं खरं नाव ठाऊक आहे का?

यामध्येच बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल यांनीदेखील आदित्य ठाकरे यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे. आपल्या कमेंटमधून शिंदे सरकारला पाडण्याचा मनसुबाही सिमी गरेवाल यांनी मांडला आहे. आपल्या कमेंटमध्ये त्या लिहितात, “काळजीचं कारण नाही, आता पुढील जबाबदारी आपल्यावर आहे, महाराष्ट्राची जनता मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीवर केलेला हा बेकायदेशीर कब्जा नक्कीच हटवेल.”

फोटो : सोशल मीडिया

सिमी गरेवाल यांच्या या कमेंटवर आदित्य ठाकरे यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. याच पोस्टमध्ये आदित्य ठाकरे पुढे लिहितात, “आमच्या सरकारचा ताबा घेण्यामध्ये पूर्वीच्या राज्यपालांची भूमिका आणि मदत लोकशाही आणि राज्यघटना दडपल्यासारखी होती. त्यांनी राज्यपाल म्हणून नव्हे तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केले. जर काही नैतिकता आणि लाज उरली असेल तर असंवैधानिक मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांचा सत्तेचा लोभ उघड आहे. पण नैतिकता आणि लोकशाही सर्वोच्च असली पाहिजे”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Simi garewal comment on aditya thackeray post about supreme verdict on maharashtra political crisis avn
First published on: 11-05-2023 at 20:49 IST