scorecardresearch

Premium

‘सिंघम अगेन’च्या क्लायमॅक्ससाठी खर्च होणार ‘इतके’ कोटी; या २ अभिनेत्यांची होणार कॉप युनिव्हर्समध्ये एंट्री?

‘सिंघम अगेन’ १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुनचा बहुचर्चित ‘पुष्पा २’सुद्धा प्रदर्शित होणार आहे

singham-again-climax
फोटो : सोशल मीडिया

सध्या रोहित शेट्टी त्याच्या ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. करीना कपूर खान व्यतिरिक्त अजय देवगण आणि अक्षय कुमार यांनीही यासाठी चित्रीकरण सुरू केले आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटोज रोहित शेट्टी व सिंघमच्या सगळ्या कलाकारांनी शेअर केले होते. मीडिया रिपोर्टनुयार रोहित शेट्टी सध्या हैदराबादमध्ये ‘सिंघम अगेन’च्या क्लायमॅक्सचे शूटिंग करत आहे.

हा क्लायमॅक्स अॅक्शननी पुरेपूर भरलेला असणार आहे जो प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असं सांगितलं जात आहे. मीडिया रीपोर्टनुसार फक्त क्लायमॅक्ससाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीने २५ कोटी खर्च केले असल्याचं सांगितलं जात आहे.

KL Rahul IPL 2024 Shoot Video Viral
VIDEO : ‘हे कोण लिहितंय…’, आयपीएल शूटमध्ये केएल राहुलचा संयम सुटला, स्क्रिप्टवरुन कर्मचाऱ्यावर संतापला
Shah Rukh Khan to join star studded WPL 2024 opening ceremony in Bengaluru
WPL 2024 : महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटनात बॉलीवूडची झलक, शाहरुख-वरूणसह ‘हे’ स्टार्स करणार परफॉर्म
rbi
‘कर्ज-जीडीपी गुणोत्तरा’त ७३.४ टक्क्यांपर्यंत घसरण शक्य; नाणेनिधीच्या इशाऱ्याला धुडकावून लावणारा रिझर्व्ह बँकेच्या पत्रिकेत दावा
Suhani Bhatnagar
‘डरमॅटोमायोसायटिस’ आजार आहे तरी काय? ज्यामुळे ‘दंगल’गर्ल सुहानी भटनागरचे निधन

आणखी वाचा : “मी अ‍ॅडल्ट चित्रपटच बनवणार कारण…” ट्रॉलर्सना एकता कपूरचं सडेतोड उत्तर

‘कोइमोई’च्या रिपोर्टनुसार ‘सिंघम अगेन’चा क्लायमॅक्स एका ग्रँड लेवलवर शूट होणार आहे. इतकंच नव्हे तर या क्लायमॅक्समध्ये अजय देवगण, अक्षय कुमार व रणवीर सिंह याच्यासह अर्जुन कपूर व टायगर श्रॉफही दिसायची शक्यता वर्तवली जात आहे. तर करीनाबरोबरच दीपिका पदूकोणसुद्धा या क्लायमॅक्समध्ये दिसण्याची शक्यता आहे.

‘सिंघम अगेन’मध्ये अभिनेता अर्जुन कपूर हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘सिंघम अगेन’चा क्लायमॅक्स हा पूर्णपणे हटके असणार आहे ज्याकडे एक स्वतंत्र चित्रपट म्हणूनही पाहता येऊ शकतं असं चित्रपटाशी जोडलेल्या काही कलाकारांनी सांगितलं आहे. यामुळेच २५ कोटींचं अवाढव्य बजेट असलेला ‘सिंघम अगेन’चा क्लायमॅक्स खास ठरणार हे मात्र नक्की.

‘सिंघम अगेन’ पुढील वर्षी १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुनचा बहुचर्चित ‘पुष्पा २’सुद्धा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी १५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर साऊथ विरुद्ध नॉर्थ असा जबरदस्त मुकाबला पाहायला मिळणार आहे अन् यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Singham again climax budget is 25 crore and arjun kapoor and tiger shroff are about to join cop universe avn

First published on: 09-10-2023 at 17:36 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×