‘पोन्नियिन सेल्वन २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय यात मुख्य भूमिकेत होती. याबरोबरच शोभिता धूलीपाला ही अभिनेत्रीही यात महत्त्वाच्या भूमिकेत होती. शोभिता आणि दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य हे दोघे सध्या एकमेकांना डेट करत असल्याची बातमी मध्यंतरी समोर आली होती.

अभिनेत्री समांथा रूथ प्रभूशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिता धूलीपाला रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. दोघांचे बरेच फोटोही व्हायरल झाले होते. मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान नागा चैतन्यने यावर भाष्य करत या चर्चेवर पडदा टाकायचा प्रयत्न केला होता, पण तरी या दोघांच्या डेटिंगबद्दल बरीच चर्चा रंगू लागली. अखेर नुकतंच शोभिता धूलीपालाने या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

आणखी वाचा : विवेक अग्निहोत्री यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस; दिग्दर्शक ट्वीट करीत म्हणाले…

‘पीएस २’च्या प्रेस स्क्रीनिंगदरम्यान या डेटिंगबद्दल प्रश्न विचारताच शोभिता म्हणाली, “मी खूप नशीबवान आहे की, मला अशा मोठ्या चित्रपटात काम करायची संधी मिळाली. मी शास्त्रीय नृत्यांगना आहे आणि मला नृत्य करायला खूप आवडतं. एआर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या तीन गाण्यांवर नृत्य सादर करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी सध्या यावरच लक्ष केंद्रित करत आहे. जे लोक कसलीही माहिती न घेता बोलतात त्यांना उत्तरं द्यायला मी बांधील नाही. मी जर कोणीतही गोष्ट चुकीची करत नसेन तर त्यावर मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शोभिता आणि नागा चैतन्य यांचे लंडनमधील एका डिनर डेटचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. ‘पीएस २’नंतर शोभिता ‘मेड इन हेवन २’ आणि ‘नाइट मॅनेजर’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. नागा चैतन्यही त्याच्या आगामी ‘कस्टडी’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.