हिंदी सिनेसृष्टीत कपूर कुटुंब प्रचलित आहे. तसेच खान कुटुंब देखील सर्वश्रृत अन् लोकप्रिय आहे. आता खान म्हटलं की तीन खान डोळ्यासमोर येतात, शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान. पण यामध्ये आणखी एक खान कुटुंब आहे, ज्याचे बॉलीवूडमध्ये मोठे योगदान आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. खरंतर या खान कुटुंबाला पतौडी कुटुंब म्हणून अधिक ओळखलं जात. याच पतौडी कुटुंबातील लाडकी लेक म्हणजेच सोहा अली खान. आज सोहाचा ४५वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्ताने आतापर्यंतचा सोहाचा प्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत. (Soha Ali Khan Birthday Special)

सिनेसृष्टीत अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलं. पण त्यांच्या वाट्याला तितकं यश मिळालं नाही. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री सोहा अली खान. सोहाला अभिनयाची खूप आवड. त्यामुळे तिने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. एवढं मोठं घराणं, आई, भाऊ, वहिनीदेखील सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरे, पण त्याचा फायदा काही सोहाला झाला नाही. अभिनयात सोहाचा जम जास्त काळ बसू शकला नाही. परंतु ती शिक्षणात अव्वल आहे.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

हेही वाचा – अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल

४ ऑक्टोबर १९७८ साली जन्मलेली सोहा उच्च शिक्षित आहे. दिल्लीच्या ब्रिटीश शाळेत तिचं शालेय शिक्षण झालं. मग तिनं आजोबा आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून इंग्लंडच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोहाने मास्टर डिग्रीसाठी बँकिंग क्षेत्रात काम केलं आणि मग लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी मास्टर्स पूर्ण केलं.

सोहा शिक्षणात खूप हुशार होती, पण तिला अभिनयाची ओढ अधिक लागली होती. सोहाला एक लोकप्रिय अभिनेत्री व्हायचं होतं. या काळात भाऊ सैफ अली खान बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेता झाला होता. त्यामुळे सोहाने लंडनमधलं शिक्षण पूर्ण होताच मुंबई गाठली. आई शर्मिला टागोर आणि वडील टायगर पतौडी यांना सोहाचा अभिनेत्री होण्याचा निर्णय अजिबात मान्य नव्हता. कार्पोरेटच्या जगात तिनं काम करावं, अशी टायगर पतौडी यांची खूप इच्छा होती, पण सोहाच मन मात्र त्यासाठी तयार नव्हतं, तिला अभिनेत्रीच व्हायचं होतं.

हेही वाचा – ‘या’ चिमुकल्यांना ओळखलंत का? एक आहे मराठीतील आघाडीची अभिनेत्री तर दुसरी भारतातील प्रसिद्ध खेळाडू

आई-वडिलांना अभिनेत्री होणं पटत नसल्यामुळे तिनं भाऊ सैफ अली खानला आपला निर्णय सांगितला. तो देखील खूप घाबरला होता. कारण आई-वडिलांचा विरोध होता आणि जर सोहाला यासाठी मदत केली तर त्याला जबाबदार धरलं जाईल, अशी भीती सैफला वाटतं होती. पण सोहाने जिद्द काही सोडली नाही, तिने २५व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

२००४ साली सोहाने ‘इचि श्रीकांत’ या बंगाली चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर तिनं चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणार शाहिद कपूरबरोबर ‘दिल मांगे मोर’मधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली. ‘रंग दे बंसती’ या चित्रपटामुळे सोहाला ओळख मिळाली. या चित्रपटासाठी तिला आयफा, जिफाचा सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर तिने बरेच चित्रपट केले. यादरम्यान सोहाला आयुष्यभरासाठी जोडीदार मिळाला. कुणाल खेमूबरोबर आपलं जमणारच नाही, असं तिला वाटलं होतं. पण २०१५ साली सोहाने कुणाल बरोबर लग्नगाठ बांधली. दोघांनी काही चित्रपटात एकत्र काम देखील केलं आहे.

हेही वाचा – ‘दादा कोंडके, कृष्णाष्टमी आणि जीवनमरणाच्या हिंदोळ्यावर’

सोहाची अभिनय कारकीर्द मोठी नसली तरी तिने या काळात ३० हून अधिक चित्रपट केले आहेत. ‘तुम मिले’, ‘गो गोआ गॉन’, ‘खोया-खोया चांद’, ’99’, ’31 ऑक्टोबर’, ‘अंतरमहाल’, ‘दिल कबड्डी’ अशा ३० हून अधिक चित्रपटात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या विविध भूमिकानंतर तिनं आणखी एक भूमिका निभावली, ती म्हणजे लेखिकेची. ‘द पेरिल्स ऑफ बींग मॉडरेटली फेमस’ (The Perils of Being Moderately Famous) हे पुस्तक सोहाने लिहीलं. यामधून तिनं आपल्या आयुष्याशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टींचा खुलासा केला. अशा या हुशार अभिनेत्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…